Sanjay Raut Elected as Parliamentary Party Leader of Shivsena | Sarkarnama

शिवसेना संसदीय पक्षनेतेपदी संजय राऊत यांची नियुक्ती

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची संसदीय दलाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पत्र लिहून त्याबाबत कळवले आहे.

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची संसदीय दलाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पत्र लिहून त्याबाबत कळवले आहे.

लोकसभेत शिवसेनेचे अठरा खासदार तर राज्यसभेत तीन खासदार आहेत. संजय राऊत हे शिवसेनेचे राज्यसभेचे गटनेते म्हणून जबाबदारी सांभाळत होते. आता संसदीय दलाच्या नेतेपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. शिवसेनेकडून दोन्ही सभागृहांसाठी पहिल्यांदाच अशी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक असलेले राऊत यांनी सन 2004 मध्ये प्रथम राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली. संसदेच्या विविध समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. 

संबंधित लेख