sanjay raut chandrababu naidu news | Sarkarnama

सध्या शिवसेना प्रेरणा देण्याचे काम करते, चंद्राबाबूंनी आमच्याकडून प्रेरणा घेतली : संजय राऊत 

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 मार्च 2018

नवी दिल्ली : सध्या प्रेरणा देण्याचे काम आम्ही करतो आहोत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी आमच्याकडून प्रेरणा घेतली आहे अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली . 

नायडू हे एनडीएतून बाहेर पडले आहेत. त्या पार्श्‍वभूमी राऊत यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता ते म्हणाले, की चंद्राबाबूंकडू धडा आम्ही घ्यायची गरज नाही. आम्ही जेव्हा एनडीएबाबत बोलत होते तेव्हा ते आमच्यावर टीका करीत. एनडीएत असताना शिवसेना कशी काय टीका कतरे ते हेच नायडू म्हणत होते आणि ते स्वत:च बाहेर पडले आहेत. जो निर्णय योग्य वाटतो तो त्यांनी घेतला. 

"टीडीपी' आणि शिवसेनेत फरक आहे. ते युपीए किंवा तिसऱ्या आघाडीत होते.2014 मध्ये मोदींची हवा होती म्हणून ते एनडीए आले.शिवसेनेचे तसे नाही.शिवसेनेची फक्त भाजपशीच युती होती. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या काही मागण्या होत्या. त्या मान्य न केल्यानेच ते बाहेर पडले. 2019 मध्ये आम्ही स्वतंत्र लढू असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आम्ही या पूर्वी बोललो आहे. आम्ही कधी बाहेर पडायचे ते आम्ही ठरवू. संध्या शिवसेना प्रेरणा देण्याचे काम करीत आहे. एनडीएतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला चंद्राबाबूंची प्रेरणा घ्यायची गरज नाही असे राऊत यांनी शेवटी सांगितले. 

संबंधित लेख