sanjay raut | Sarkarnama

कॉंग्रेसच्या नाकर्तेपणाची "कमाई" भाजपला

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 24 एप्रिल 2017

मुंबई : नुकत्याच झालेल्या लातूर, चंद्रपूर आणि परभणी महापालिकेतील निकालांवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून तिखट प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेसने एवढ्या वर्षात जो नाकर्तेपणा दाखवला त्यामुळेच आता भाजपला यश मिळू लागले. सरकार आणि संघ कार्यकर्त्यांची फौज असल्याने पक्षाला हे यश मिळणारच असा चिमटाही सामनाच्या अग्रलेखातून काढण्यात आला आहे. 

सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर वार करताना, शाब्दीक चिमट्यांचा आधार घेत भाजपला सोडणार नसल्याचाच इशारा सेनेने दिला आहे. लातूर, चंद्रपूर महापालिकेतील विजयावरुन शिवसेनेने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. कॉंग्रेसची जागा भाजप घेत असून कॉंग्रेस हा पक्ष कामात "झीरो" आणि मतपेटीत " हिरो" होता असे सांगत शिवसेनेने अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला आहे. जनता अशी वाहवत का चालली आहे याचा शोध घ्यायला हवा असेही शिवसेनेने इच्छा व्यक्त केली आहे. 

लातूर, चंद्रपूर आणि परभणी महापालिकेतील निकालांवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेसने एवढ्या वर्षात जो नाकर्तेपणा दाखवला त्यामुळेच आता भाजपला यश मिळू लागले. सरकार आणि संघ कार्यकर्त्यांची फौज असल्याने पक्षाला हे यश मिळणारच असेही सेनेने म्हटले आहे. सध्या भाजपच्या यशाचा मौसम आहे. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस जादूचे प्रयोग करत आहे. जनतेला या प्रयोगात मन रमवायचे असल्याने ते भाजपला मतदान करत असून यामुळे गांभीर्याने काम करणाऱ्यांचाही पराभव होत राहणार असे अग्रलेखात म्हटले आहे. 

सामनाच्या आजच्या आग्रलेखात कॉंग्रेसचाही चांगलाच समाचार घेतला आहे. लातूरच्या गडीचे ढासळने सेनेच्याच जिव्हारी लागलेल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा दाखला देत " हे नवनवे जादूचे प्रयोग करून दाखवीत आहेत. लोकांना या प्रयोगात मन रमवायचे आहे. तोप्रर्यंत भाजपास विजय मिळत जाईल" असे भाकितही या अग्रलेखात व्यक्त करत "लोकशाहीचे दुर्देव" म्हणत भाजपचा समाचार घेतला आहे.  

संबंधित लेख