sanjay rathod and bhavana | Sarkarnama

संजय राठोड- भावना गवळींमधील मतभेद उघड

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 जुलै 2017

नागपूर : महसूल राज्यमंत्री संजय राठोड व खासदार भावना गवळी यांच्यातील मतभेद आता तीव्रपणे समोर आले असून यवतमाळ जिल्हा शिवसेना प्रमुखांची झालेली नियुक्ती "मातोश्री'वरून एका दिवसातच रद्द झाली. 

सेना नेते संजय राठोड व खासदार भावना गवळी यांच्यामध्ये काही महिन्यांपर्यंत चांगला समन्वय होता. या दोन्ही नेत्यांमधील समन्वयामुळेच यवतमाळ जिल्हा परिषद व नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला चांगलेच यश मिळाले होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून तणातणी सुरू झाली. त्यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. 

दोन दिवसांपूर्वीच यवतमाळ शहर प्रमुख म्हणून पराग पिंगळे यांची नियुक्ती झाली होती. पिंगळे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या विश्‍वासातील म्हणून ओळखले जातात. पिंगळेंच्या नियुक्तीपूर्वी खासदार भावना गवळी यांचे मतही विचारात घेतले नाही तसेच नियुक्तीपूर्वी या नियुक्तीच्या संदर्भात काही सांगण्याचे सौजन्यही दाखविले नाही. 

पिंगळेंच्या नियुक्तीने दुखावलेल्या खासदार गवळी यांनी थेट मातोश्रीकडे तक्रार केली. यामुळे सकाळी झालेल्या नियुक्तीवर सायंकाळी स्थगनादेश आला. 
वाशिम जिल्हा प्रमुखाच्या नियुक्तीबद्दलही खासदार गवळी यांना विचारले नसल्याचे समजते. संजय राठोड वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. यवतमाळ लोकसभा मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील काही भाग आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्याच्या शिवसेना प्रमुखाची नियुक्ती करताना आपले मत विचारात घ्यावे, असे खासदार गवळींना वाटते. परंतु संजय राठोड गेल्या काही महिन्यांपासून खासदारांना विचारात न घेताच नियुक्ती करीत असल्याने मतभेदांची वाढत चालली आहे. पिंगळेंच्या नियुक्तीवरून यवतमाळ जिल्ह्यातील हे दोन्ही नेते समोरासमोर आलेले आहेत. 
 
संबंधित लेख