sanjay rathod | Sarkarnama

आजचा वाढदिवस : संजय राठोड, महसूल राज्यमंत्री

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 जून 2017

एक शिवसैनिक, शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख, त्यानंतर आमदार व मंत्री अशा चढत्या भाजणीने राजकारणात यशस्वी कारकिर्द घडविणारे महसूल राज्यमंत्री संजय राठोड शिवसेनेचे विदर्भामधले एक प्रमुख नेते आहेत. राठोड यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा दारव्हा विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केला. कॉंग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांचा त्यांनी पराभव केला. तेव्हापासून दारव्हा मतदारसंघावर त्यांची भक्कम पकड आहे. दारव्हा मतदारसंघातून सलग तीनवेळा त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. सध्या ते महसूल राज्यमंत्री असून वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

एक शिवसैनिक, शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख, त्यानंतर आमदार व मंत्री अशा चढत्या भाजणीने राजकारणात यशस्वी कारकिर्द घडविणारे महसूल राज्यमंत्री संजय राठोड शिवसेनेचे विदर्भामधले एक प्रमुख नेते आहेत. राठोड यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा दारव्हा विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केला. कॉंग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांचा त्यांनी पराभव केला. तेव्हापासून दारव्हा मतदारसंघावर त्यांची भक्कम पकड आहे. दारव्हा मतदारसंघातून सलग तीनवेळा त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. सध्या ते महसूल राज्यमंत्री असून वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यात राठोड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

संबंधित लेख