sanjay puram birthday | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे नवी दिल्लीत निधन

आजचा वाढदिवस : संजय पुराम आमदार (आमगाव, गोंदिया) 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्‍यातील एका खेड्यातून सामाजिक कार्याला सुरवात करणाऱ्या संजय पुराम यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवून यश संपादन केले. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघातून पुराम यांनी भाजपसाठी यश मिळवून दिले. सालेकसा तालुका हा आदिवासी बहुल आहे. छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमेवरील या भागातील आदिवासींचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संजय पुराम यांनी नेहमीच प्रयत्न केले. एका शेतकरी कुटुंबातून समोर आलेल्या या युवकाने सामाजिक कार्यातूनच तालुक्‍यात ओळख निर्माण केली. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी गोंदिया जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या.

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्‍यातील एका खेड्यातून सामाजिक कार्याला सुरवात करणाऱ्या संजय पुराम यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवून यश संपादन केले. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघातून पुराम यांनी भाजपसाठी यश मिळवून दिले. सालेकसा तालुका हा आदिवासी बहुल आहे. छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमेवरील या भागातील आदिवासींचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संजय पुराम यांनी नेहमीच प्रयत्न केले. एका शेतकरी कुटुंबातून समोर आलेल्या या युवकाने सामाजिक कार्यातूनच तालुक्‍यात ओळख निर्माण केली. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी गोंदिया जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या. तसेच त्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सुद्धा होत्या. या तालुक्‍यात त्यांनी भाजपचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न केले. यामुळेच त्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळाली. 

संबंधित लेख