sanjay patil criticise gopichand padalkar | Sarkarnama

पडळकर अदखलपात्र, त्यांना जनतेने लायकी दाखवून दिलीय!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

जिल्ह्यातील भाजपमध्ये एकही लायकीचा नाही असा हल्लाबोल करणारे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांची खासदार संजय पाटील यांनी अदखलपात्र या शब्दात वासलात लावली.

सांगली : जिल्ह्यातील भाजपमध्ये एकही लायकीचा नाही असा हल्लाबोल करणारे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांची खासदार संजय पाटील यांनी अदखलपात्र या शब्दात वासलात लावली.

सिंचन योजना सुरु करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहित देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत खासदार पाटील यांनी पडळकर यांच्या कालच्या सर्व आरोपांबाबत भाष्य टाळताना त्यांची लायकी जनतेने एकदा दाखवून दिली आहे आणि पुढेही दाखवून दिली जाईल असे सांगून फटकारले.

काल पडळकर यांनी खासदार पाटील यांच्यावर हल्लाबोल करताना जिल्ह्यात भाजप नेतृत्वाच्या क्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह उभे केले होते. खासदारांमुळेच शिवाजीराव नाईक व सुरेश खाडे मंत्रीपदास मुकले. साधी पाणी आवर्तन सुरु करण्यासाठी खासदारांना राजीनाम्याची धमकी द्यावी लागते. जिल्ह्यातील भाजपशी माझा संबध संपला आहे. पुढचा निर्णय योग्यवेळी जाहीर करू असे फटकारे मारत पडळकर यांनी बंडाचे निशान फडकवले आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार पाटील यांना पत्रकार परिषदेत वारंवार विचारूनही त्यांनी मात्र पडळकर अदखलपात्र अशा शब्दात प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले. 
ते म्हणाले,"" ज्यांची लायकी जनतेने यापुर्वीच दाखवून दिली आहे. त्यांना यापुढेही त्यांची लायकी जनता दाखवून देईल. त्यामुळे मी त्यावर काय बोलणार.'' 

संबंधित लेख