sanjay nirupam, bjp activities, mumbai | Sarkarnama

राज्यात भाजप नेत्यांच्या गुंडागर्दीला ऊत : निरुपम 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

मुंबई : पारदर्शी कारभाराचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत मोठया प्रमाणात गुंडाराज सुरु असल्याचा आरोप मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष निरुपम यांनी केला आहे. फडणवीस यांच्याकडे गृह खाते असताना गुंडाना पक्षात प्रवेश कसा मिळतो याकडे निरुपम यांनी लक्ष वेधले आहे. 

भाजपचे आमदार अमित साटम यांनी मुंबईतील विलेपार्ले येथील फेरीवाल्यांना शिवीगाळ व मारहाण केली होती. त्याचबरोबर साटम यांनी पोलिसांनाही शिवीगाळ केली होती. घडल्या घटनेची व्हिडीओ क्‍लिप प्रसारमाध्यमातून व्हायरल झाली. घडल्या प्रकाराबाबत साटम यांच्याविरोधात अजूनही कोणतीच कारवाई न झाल्याने संजय निरुपम यांनी मारहाण झालेल्या फेरीवाल्यांसोबत गुरुवारी जुहू पोलीस ठाण्यात धडक मोर्चा काढला. दरम्यान, पोलिसांनी साटम यांच्याविरोधात अदखलपत्र गुन्हा दाखल केला असून तपास करण्यासाठी अंधेरी न्यायालयात अर्ज केला आहे. 

याबाबत विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री खाते असताना देखील भाजप नेत्यांची गुंडागर्दी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडून पक्षातील गुंड गुंडाराजकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.  
 
संबंधित लेख