sanjay kute birthday | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

आजचा वाढदिवस : आमदार डॉ. संजय कुटे (जळगाव जामोद) 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

कोणताही राजकीय वारसा नसतानाही केवळ जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजप पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेल्या डॉ. संजय कुटे यांची राजकीय कारकीर्द अत्यंत रोचक आहे. 

कोणताही राजकीय वारसा नसतानाही केवळ जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजप पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेल्या डॉ. संजय कुटे यांची राजकीय कारकीर्द अत्यंत रोचक आहे. 
वडील शिक्षक आणि आई गृहिणी तसेच, इतर तीन भाऊ राजेंद्र, विनोद व प्रमोद वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असताना वैद्यकीय क्षेत्र सोडून मतदार संघात विकासात्मक बदल घडविण्याच्या दृष्टिकोनातून राजकारणात पहिले पाऊल ठेवले. राजकारण नव्याने प्रवेश करत तालुका अध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर विधानसभा निवडणूक लढविण्याची जबाबदारी पक्षाने टाकली आणि त्यापासून आजपर्यंत सलग तीन वेळा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत जळगाव जामोद मतदार संघाचा चेहरामोहराच बदलून टाकला. 

खारपानपट्ट्यांच्यावर राज्याच्या इतिहासात सर्वांत मोठी 140 गावाची पाणी पुरवठा योजना, मतदार संघातील ग्रामपंचायत स्तरावर आरओ प्लॅंटची निर्मिती, सिंचनासाठी शाश्वत अशी जिगावसह प्रकल्प आणि दोन राष्ट्रीय महामार्गासह आदिवासी भागांना जोडणाऱ्या रस्त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. मतदार संघातील संत गजानन महाराज विकास आराखडा, संग्रामपूर तालुक्‍यातील मोठ्या गावातील बसथांब्याचे सौदर्यीकरण त्यांनी केले. 

पक्षातही संघटन कौशल्य बळकट करत तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व आता प्रदेश सरचिटणीस पदावर आहेत.  
 

संबंधित लेख