Sanjay Kedar transfered | Sarkarnama

गडहिंग्लजचे मुख्याधिकारी  संजय केदार यांची बदली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

गडहिंग्लज   : येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार यांची अखेर बदली झाली. त्यांच्या जागी जेजुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांची नियुक्ती झाली आहे. यानिमित्ताने पालिकेला प्रथमच महिला मुख्याधिकारी मिळाल्या आहेत. 

श्री. केदार येथील पालिकेकडे 15 जूनला मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले. त्यापूर्वी ते भोर नगरपालिकेकडे कार्यरत होते. मात्र महिनाभरातच त्यांचे कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांशी बिनसले. कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते, पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, अशा त्यांच्याबाबत तक्रारी होत्या. यामुळे मुख्याधिकारी-पदाधिकाऱ्यांतील वाद चिघळला होता. त्यानंतर श्री. केदार महिन्याच्या रजेवर गेले होते. 

यामुळे येथील पालिकेचा अतिरिक्त कार्यभार जयसिंगपूरचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्याकडे दिला होता. रजेचा कालावधी संपल्यानंतर श्री. केदार यांनी पुन्हा 13 ऑक्‍टोबरपर्यंत रजा वाढविली होती. दरम्यान आज श्री. केदार यांच्या बदलीचा आदेश आला. त्यांची जेजुरी नगरपालिकेकडे बदली झाली आहे. त्यांच्या जागी सुषमा कोल्हे यांची नियुक्ती झाली आहे.  पालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. यामुळे गडहिंग्लजच्या प्रशासनातील आणखी एक महत्त्वाचे पद महिलेकडे आले आहे. 

संबंधित लेख