sanjay dutta support priya dutta | Sarkarnama

माझ्या वडलांप्रमाणे बहीण प्रिया दत्तही चांगले काम करते : संजय दत्त 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 एप्रिल 2019

मुंबई : "" माझे वडील सुनील दत्त यांचा मुंबईतील उत्तर मध्य हा लोकसभा मतदारसंघ होता. ही जागा कॉंग्रेसकडे कायम राहिल असे मला वाटते. माझ्या वडीलांनी चांगले काम केले होते आणि आता प्रियाही ही करत आहे,'' असे मत अभिनेते संजय दत्त यांनी आज व्यक्त केले. 

बहीण प्रिया दत्त हिचा अर्ज भरण्यासाठी भाऊ आणि अभिनेता संजय दत्त मुंबईतील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. कॉंग्रेसचे मुंबईतील उमेदवार संजय निरुपम, उर्मिला मातोंडकर यांनीही आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले आहेत. 

संजय दत्त म्हणाले, की जो चांगलं काम करेल तो निवडून येईल असे मला वाटते. देवाकडे प्रिया निवडणुकीत जिंकावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. जर मला आदेश मिळाला तर एक भाऊ म्हणून मी तिचा प्रचार करेन. मी कधीही राजकारणाशी जोडलो नव्हतो आणि आजही नाही.'' 

प्रिया दत्त या संजय दत्त यांच्या भगिनी आहेत. 2014 निवडणुकीत मोदी लाटेत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 

संबंधित लेख