sanjay dhotre mp | Sarkarnama

खासदार संजय धोत्रेंना निवडणूक आयोगाचा दिलासा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

अकोला : भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना निवडणूक खर्चावरून अपात्र ठरविले जाऊ शकत नाही, असे उत्तर भारतीय निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडीपाठात सादर केले आहे. आयोगाचे हे उत्तर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व अरूण उपाध्ये यांनी रेकॉर्डवर घेतले असून याप्रकरणाची पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी निश्‍चित करण्यात आली आहे. 

भारतीय निवडणूक आयोगातर्फे 24 जानेवारी 2014 रोजी प्रकाशित मार्गदर्शक तत्वे व 13 मार्च 2014 रोजी जारी अधिसुचेनुसार लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये खाते सुरू करणे आवश्‍यक होते. त्या खात्यातील रक्कमच निवडणुकीवर खर्च करता येणार होती. परंतु, संजय धोत्रे यांनी कायद्याचे पालन केले नाही. त्यांनी स्वतःच्या बॅंक खात्यात सर्व स्त्रोतांचे मिळून 34 लाख 25 हजार रुपये जमा दाखवले होते. 

निवडणुकीनंतर त्यांनी निवडणुकीवर खर्च केलेल्या 32 लाख 96 हजार 595 रुपयांचा तपशील सादर केला. या प्रकरणात हिंगणी येथील श्रीकृष्ण अडबोल यांनी त्यावर आक्षेप घेऊन 20 मार्च 2015 रोजी लोक प्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम 10 अ अंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रार प्रलंबीत असताना आयोगाचे अवर सचिवांनी धोत्रे यांना पत्र पाठवून निवडणूक खर्चाचा योग्य तपशील सादर करण्यास सांगितले. त्यानुसार धोत्रे यांनी खर्चात दुरूस्ती करून त्यात सहा लाख 47 हजार 895 रुपयांचा समावेश केला. 

परिणामी एकूण खर्च 39 लाख हजार 490 रुपये झाला. हा खर्च बॅंक खात्यात जमा रकमेपेक्षा जास्त असल्यामुळे धोत्रे अपात्र ठरतात असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. या प्रकरणात आयोगाने सादर केलेल्या उत्तरानंतर पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. 
 
संबंधित लेख