sanjay dhote mla birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस ः आमदार संजय धोटे, भाजप, राजूर (चंद्रपूर) 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले संजय धोटे यांची राजकीय कारकिर्द शेतकरी संघटनेतून सुरू झाली. शरद जोशी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या शेतकरी संघटनेत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. शेतकरी संघटनेचे राजुरा तालुक्‍यात संघटन बांधण्यात संजय धोटे यांनी बरेच कार्य केले. 

शेतकरी संघटनेचा प्रभाव कमी कमी होत गेल्यानंतर त्यांनी काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राजुरा मतदारसंघात भाजपला यश मिळवून दिले. या मतदारसंघावर कॉंग्रेस व शेतकरी संघटनेचा प्रभाव राहिला आहे. तरीही संजय धोटे यांनी जनसंपर्काच्या माध्यमातून भाजपला विजय मिळवून दिला.  
 
संबंधित लेख