'एसीबी' प्रमुखपदी संजय बर्वे

संजय बर्वे राज्य सुरक्षा महामंडळाचे महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक होते.
brave acb.
brave acb.

मुंबई  : दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) प्रमुखपदी अखेर राज्य सरकारने संजय बर्वे यांची नियुक्ती केली. ते राज्य सुरक्षा महामंडळाचे महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक होते. याबाबतचे आदेश गृह मंत्रालयाने मंगळवारी काढले. 

दत्ता पडसलगीकर हे राज्याचे पोलिस महासंचालक झाल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तपदासाठीही बर्वे यांचे नाव चर्चेत होते; मात्र शेवटी ते मागे पडले. सरकारने केंद्रामध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या सुबोधकुमार जयस्वाल यांना मुंबईच्या आयुक्तपदी नेमले. बर्वे हे राज्य गुप्तवार्ता विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते.

एसीबीचे तत्कालीन प्रमुख सतीश माथुर यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यापासून हे पद रिक्त होते. माथुर यांच्या बदलीनंतर अतिरिक्त पोलिस महासंचालक विवेक फणसाळकर हे एसीबीची धुरा सांभाळत होते. फणसाळकर यांची नुकतीच ठाणे पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली.  

संजय बर्वे हे धडाडीचे अधिकारी असून आय पी एस आणि बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून चालणारे रॅकेट त्यांनी शोधून काढले होते . येत्या ऑगस्ट महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहेत . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com