sanjaj barve acb chief | Sarkarnama

"एसीबी' प्रमुखपदी संजय बर्वे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

मुंबई : दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) प्रमुखपदी अखेर राज्य सरकारने संजय बर्वे यांची नियुक्ती केली. ते राज्य सुरक्षा महामंडळाचे महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक होते. याबाबतचे आदेश गृह मंत्रालयाने मंगळवारी काढले.
 
दत्ता पडसलगीकर हे राज्याचे पोलिस महासंचालक झाल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तपदासाठीही बर्वे यांचे नाव चर्चेत होते; मात्र शेवटी ते मागे पडले. सरकारने केंद्रामध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या सुबोधकुमार जयस्वाल यांना मुंबईच्या आयुक्तपदी नेमले. बर्वे हे राज्य गुप्तवार्ता विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते.

एसीबीचे तत्कालीन प्रमुख सतीश माथुर यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यापासून हे पद रिक्त होते. माथुर यांच्या बदलीनंतर अतिरिक्त पोलिस महासंचालक विवेक फणसाळकर हे एसीबीची धुरा सांभाळत होते. फणसाळकर यांची नुकतीच ठाणे पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली. 

संबंधित लेख