आजचा वाढदिवस : संग्राम थोपटे - आमदार (भोर, मुळशी, वेल्हे) 

आजचा वाढदिवस : संग्राम थोपटे - आमदार (भोर, मुळशी, वेल्हे) 

घरातील राजकीय बाळकडूच्या जोरावर आणि माजी मंत्री व कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या पाठबळामुळे राज्यातील सर्वांत डोंगराळ व अडचणीचा असलेल्या भोर विधानसभा मतदारसंघात आमदार संग्राम थोपटे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. भोर मतदारसंघातील भोर, वेल्हे व मुळशी तालुक्‍यात आमदार संग्राम थोपटे जनसामान्यांमध्ये आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. पुणे जिल्ह्यात कॉग्रेसचे एकमेव आमदार असलेले संग्राम थोपटे विकासकामे करण्यात यशस्वी ठरत आहेत. मागील चार वर्षांच्या कालावधीत त्यांनी मतदारसंघात सुमारे 450 कोटींची विकासकामे केली आहेत. 

कॉग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या भोर-वेल्हे तालुक्‍यात मुळशी तालुक्‍याचा समावेश झाला. तरीही 2009 साली राजकारणातील पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार संग्राम थोपटे यांनी नियोजनबद्ध प्रचार करून विरोधकांवर मात केली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजयाची परंपरा कायम राखली. भोर तालुक्‍यातील बंद पडण्याच्या स्थितीतील राजगड सहकारी साखर कारखाना सुस्थितीत आणण्याचे धनुष्य त्यांनी यशस्वीपणे पेलले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, राजगड कारखाना, भोर नगरपालिका, तालुका खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती यासारख्या सहकारी संस्थांवर आपली पकड कायम ठेवली आहे. राजगड ज्ञानपीठाच्या माध्यमातून सुशिक्षित तरुण-तरुणीशी असलेल्या योग्य संपर्कामुळे तरुणाईही सदैव त्यांच्यासोबत राहिली आहे. 

मतदारसंघाच्या मुळशी तालुक्‍यातील लव्हासा व हिंजवडी परिसर, वेल्हे तालुक्‍यातील गुंजवणी-चापेट, पानशेत व वरसगाव धरण आणि भोरमधील नीरा-देवघर भाटघर धरणांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. मतदारसंघातील गड किल्ले, रस्ते, वीज आणि पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तयार राहिले आहेत. तालुक्‍यातील पर्यटनाच्या दृष्टीने आणि तीर्थक्षेत्रांच्या दर्जासाठी प्रयत्न सुरू असून भोरमधील एम.आय.डी.सी. चा हाती घेतलेला प्रश्न पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com