`भोरमध्ये काॅंग्रेस आमदार थोपटेंकडून सुप्रिया सुळेंना दगाफटका; भाजपला केली मदत`

`भोरमध्ये काॅंग्रेस आमदार थोपटेंकडून सुप्रिया सुळेंना दगाफटका; भाजपला केली मदत`

नसरापूर : भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी लोकसभा निवडणुकीत आघाडीधर्म पाळला नसुन याची किंमत त्यांना विधानसभा निवडणुकीत मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झालेली असताना देखील भोर विधानसभा मतदार संघात काँग्रेस कार्यकर्त्यांनी व विद्यमान आमदारांनी आघाडीधर्माचे पालन न करता भारतीय जनता पार्टीचे काम केल्या आरोप रणजित शिवतरे यांनी केला. भोर शहरांमधील नगरपालिकेचे काँग्रेसचे सर्व नगरसेवक मतदाना दिवशी भाजपाच्या पोलवर उपस्थित राहून भाजपला मतदान होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे खुद्द सुप्रिया सुळे यांनी पाहिले आहे, असा दावा शिवतरे यांनी केले.

मी भोरचा मावळा असून, दिलेल्या शब्दानुसार राष्ट्रवादी काॅंग्रेसचे काम केले असल्याची ग्वाही थोपटे यांनी दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. 

आमदार संग्राम थोपटे यांनी भोर तालुक्यात झालेल्या पाच जाहीर सभांव्यतिरीक्त इतर कोठेही व्यक्तिगत वा कार्यकर्त्यां समवेत प्रचार केला नाही. प्रचार बैठकांसाठी ते वेल्हे व मुळशी तालुक्यात फिरकले देखिल नाहीत. भोर तालुक्यातील काँग्रेसचे एकमेव जिल्हा परिषद सदस्य मतदानादिवशी त्यांच्या व्यवसायातुन बाहेर देखिल पडले नाही. तसेच वेल्हे तालुक्यात काँग्रेसची सत्ता असताना देखिल तेथील पंचायत समिती सभापती ,उपसभापती,जिल्हा परिषद सदस्य शेवट पर्यंत प्रचारात सहभागी झाले नाही, असे आरोप शिवतरे यांन केले. 

या सर्व घटनांवरुन काँग्रेसने जाणीवपूर्वक आघाडीधर्म पाळला नसल्याचे सिद्ध होत असुन याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठांना देखिल माहीती देण्यात आली आहे. याचे परिणाम काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत भोगावे लागतील, अशी टिका शिवतरे यांनी केली आहे.

काँग्रेसने जरी अघाडीधर्म पाळला नसला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वपदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले असुन या बळावरच भोर, वेल्हे व मुळशी या तीनही तालुक्यांमध्ये मिळुन सुप्रिया सुळे यांना 25 हजाराचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास शिवतरे यांनी व्यक्त केला.

सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये बोलताना निवडून आल्यानंत प्रथम भोरला येवुन थोपटे यांना गुलाल लावणार असल्याचे सांगितले होते. मात्र आघाडी धर्माचे पालन न केल्याने गुलाल लावायचा की बुक्का, हे कार्यकर्ते ठऱवतील, असा टोला शिवतरे यांनी लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com