sangram jagtap | Sarkarnama

आपल्यावरील कारवाई मंत्र्याच्या सांगण्यावरून - संग्राम जगताप

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

नगर : राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर करीत प्रशासनावर मंत्र्यांनी दबाव आणून आमच्यावर कारवाई करण्यास भाग पाडले. खोट्या प्रकरणात अडकवून औरंगाबादला पाठविले. आम्हाला अडकविण्यात राजकीय हेतू होता असा गौप्यस्फोट आमदार संग्राम जगताप यांनी खासदार दिलीप गांधी यांचे नाव न घेता केला. महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसभांत राष्ट्रवादीने भाजपवर टीकेचे लक्ष्य केले आहे. 

शहरातील सभांमधून जगताप यांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. प्रचाराच्या नियोजनाच्या बैठकीत बोलताना आमदार जगताप म्हणाले, सोशल मीडियाच्या माध्यमातून मुद्दाम गैरसमज पसरवून शहरातील वातावरण बिघडविले जात आहे. विकासाचे मुद्दे दूर गेले आहेत. आपण महापौर असताना कोठी रस्ता ते स्वस्तिक चौक हा रस्ता दर्जेदार केला होता. ज्यांच्या दारावरून हा रस्ता गेला, त्यांना साधा दुरुस्तही करता आला नाही, ते काय शहराचा विकास करणार, असा टोला त्यांनी खासदार दिलीप गांधी यांचे नाव न घेता लगावला. 

त्यांनी आम्हाला अडचणीत आणले. खोटे गुन्हे दाखल केले. प्रशासनावर दबाव आणून आम्हाला औरंगाबादच्या कारागृहात धाडले. अशा विचाराचे लोक शहराचा विकास काय करणार. ते उड्डाणपुल करण्याचे आश्वासने देतात, प्रत्यक्षात उड्डाणपुल केव्हा करणार, हे आता विचारण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. 

संबंधित लेख