sangram deshmukh and vishvajeet kadam come together in kadegaon | Sarkarnama

विश्वजित कदमांच्या स्वाईन फ्लूची काळजी संग्राम देशमुखांना!

संतोष कणसे
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

कडेगाव (सांगली) : हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक असलेल्या कडेगाव शहरांत आज मोहरम निमित्त गगनचुंबी तांबुतांच्या गळाभेटी झाल्या. परंतु त्यापूर्वी येथे आगामी विधानसभा निवडणुक मैदानातील राजकीय विरोधक असलेल्या आमदार विश्वजित कदम व जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिह देशमुख यांची गळाभेट झाली.  

मोहरमच्या निमित्ताने सर्वधर्मिय आज एका व्यासपीठावर येतात. पावणेदोनशे वर्षाचीही ही परंपरा. तांबुतांच्या गळाभेटीच्या कार्यक्रमाला सर्व जातीधर्माच्या लोकाबरोबरच सर्व राजकीय पक्षाचे नेतेही उपस्थित होते. 

सध्या तालुक्‍यात सर्वत्र स्वाईन फ्लूची साथ आहे. त्यामुळे येथे मोहरमनिमित्त आलेल्या भाविकांसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिह देशमुख यांच्या पुढाकाराने भाविकांसाठी दहा हजार मास्क वितरित करण्यात आले. हे निमित्त साधत श्री देशमुख यांनी राजकीय विरोधक विश्‍वजीत यांनाही मास्क बांधला. कदम यांनीही देशमुख यांच्या या सौजन्यपूर्ण कृतीचा आदर करीत स्वतःही हा मास्क बांधून घेतला. हस्तांदोलन करुन देशमुख यांचे आभार मानले. त्यानंतर दिर्घकाळ उभय नेते व्यासपीठावर मांडीला मांडी लावूनही बसले. त्यांच्यात गप्पाही रंगल्या. अनेकांच्या भुवयाही त्यामुळे उंचावल्या. काहींनी हा प्रसंग मोबाईल कॅमेराबद्ध केला. ताबुतांच्या गळाभेटी होत असताना या राजकीय विरोधकांच्या गळाभेटीही व्हायरल झाल्या.  

संबंधित लेख