sangliwadi ward bjp wins | Sarkarnama

माजी आमदार दिनकर पाटलांनी सांगलीवाडीत कमळ फुलवले! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सांगली : माजी आमदार दिनकर पाटील यांनी सांगलीवाडीतील तीनही जागा जिंकत प्रतिष्ठेची लढत जिंकली आहे. सांगलीत भाजप मुसंडी मारताना दिसत आहे. प्रभाग 17 मध्ये एकमेव राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाले असून या प्रभागातील तीन जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यात गीता सुतार, गितांजली सूर्यवंशी, लक्ष्मण नवलाई विजयाच्या वाटेवर आहेत. 

मतमोजणीच्या दुसऱ्या टप्प्यात धक्कादायक निकालात किशोर जामदार यांचा पराभव झाला. त्यामुळे या प्रभाग सातमध्ये चारही भाजपचे गणेश माळी, संगीता खोत, आनंदा देवमाने, गायत्री कुल्लोळी विजयी झाले. प्रभाग 13 मध्ये सांगलीवाडीत अजिंक्‍य पाटील यांना 4540, दिलिप पाटील 3358 आणि हरिदास पाटील 2984 इतकी मते मिळाली आहेत. अन्य भाजप उमेदवारात गजानन अलदार, अपर्णा कदम विजयी झाले. प्रभाग 17 मध्ये लक्ष्मण नवलाई, गीता सुतार, लक्ष्मण नवलाई विजयी झाले. अशा दहा जागा जिंकत भाजपने इथे मुसंडी मारली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख