Sangli will be given representation in cabinet : Devedra Fadnavis | Sarkarnama

मंत्रीमंडळात सांगली जिल्ह्याला संधी देवू : मुख्यमंत्री फडणवीस

सरकारनामा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

 नेमके मंत्रीपद कोणाच्या पदरी जाणार याची मात्र उत्सुकता कायम आहे. सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक यांची नावे चर्चेत आहे. 
 

सांगली: " सांगली जिल्ह्यानं भाजपला भरभरून दिले आहे. मंत्रीमंडळात जिल्ह्याला संधी देवू," अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. दरम्यान, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक यांची नावे चर्चेत आहेत. 

सांगलीला पूर्णवेळ देईल, असा पालकमंत्री पहिल्यापासून मिळालेला नाही. सांगलीबाबत मात्र निधी आणणे असेल किंवा योजना राबविणे असेल याबाबत येथील नेतृत्व कमी पडत असल्याची टीका विरोधक करत असतात. एकही मंत्री नाही ही खंत नेते, कार्यकर्त्यांची आहे याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकार बैठकीत प्रश्‍न विचारण्यात आला. 

त्यावेळी त्यांनी सांगलीचा नक्की विचार होणार आहे. सांगलीने भरभरून दिले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

सदाभाऊ खोत यांना कृषी राज्यमंत्रीपद व त्यानंतर खासदार पाटील यांची महामंडळावर वर्णी लागल्यामुळे मंत्री पद मिळणार की नाही, याबाबत नेहमीच चर्चा सुरू राहिली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आजच्या या सुखद बातमीने कार्यकर्त्यांत मोठा उत्साह दिसून आला. पण नेमके मंत्रीपद कोणाच्या पदरी जाणार याची मात्र उत्सुकता कायम आहे. सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक यांची नावे चर्चेत आहे. 
 

संबंधित लेख