'जलयुक्त शिवार'मध्ये सांगलीचा झेंडा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर, महसुलमंत्री चंद्रकात पाटील यांचा कोल्हापूरसह 16 जिल्ह्याचा समावेश "रेड झोन' मध्ये करण्यात आला आहे.
'जलयुक्त शिवार'मध्ये सांगलीचा झेंडा!

सांगली : गेल्या चार वर्षापासून राज्य शासनाने सुरु केलेल्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत सन 2018-19 मध्ये सांगली जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमाकांवर सातारा, तिसऱ्या स्थानी सिंधुदुर्ग जिल्हा आहे. 

विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हात केवळ 4 टक्के काम झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर, महसुलमंत्री चंद्रकात पाटील यांचा कोल्हापूरसह 16 जिल्ह्याचा समावेश "रेड झोन' मध्ये करण्यात आला आहे. कोल्हापूर, लातूर, रायगड, धुळे जिल्ह्यात कामेच (शून्य टक्के) झालेली नाहीत. 

जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणांनी समन्वयाच्या कामातून हे यश मिळाले आहे. जिल्ह्यात यावर्षी प्रस्तावित आराखड्यानुसार 2700 कामे आहेत. त्यासाठी 35 कोटी निधीची तरतूद होती. सर्व कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. जलयुक्त शिवार अभियान योजना शासनाची प्राधान्यक्रमाची आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यात गेल्या चार वर्षांमध्ये जलयुक्त शिवार अभियानातून अनेक कामे झाली आहेत. त्याचे चांगले परिणाम जिल्ह्यात दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे यातील बऱ्याचशा कामांमध्ये पाणीसाठा झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्याचा फायदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नक्की होणार आहे. 

राज्यात सर्वाधिक काम चांगले झाले याचा आनंद आहे. यंदा जिल्ह्यातील 103 गावात अभियान राबवले जात आहे. वर्षात आतापर्यंत एक हजार 562 कामे पूर्ण तर 722 कामे प्रगतीपथावर आहेत. प्रगतीपथावरील कामे आणि पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी 85 आहे. उर्वरित 15 टक्के कामे मुदतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.  
-विजय काळम-पाटील, जिल्हाधिकारी सांगली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com