जयंतराव, माझा दौरा कधीच कोरडा नसतो; फडणवीसांचा पलटवार! 

जयंतराव, माझा दौरा कधीच कोरडा नसतो; फडणवीसांचा पलटवार! 

सांगली : मुख्यमंत्र्यांच्या गतवेळच्या वाळवा दौऱ्यात जयंत पाटलांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. तेव्हा जयंत पाटलांनी "माझा नाद करू नका' असा इशाराच दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच इस्लामपूरला किती निधी दिला? असा प्रश्‍न विचारून ठिणगी टाकली. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी "आमचा दौरा कधीच कोरडा नसतो...' असा पलटवार करुन इस्लामपूरला आम्हीच 11 महिन्यात 107 कोटी इतका भरघोस निधी दिल्याचे नमूद केले. या दोन नेत्यातील कलगी तुऱ्याची चर्चा पुन्हा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

वाळवा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे आणि कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते झाले. तेव्हा हुतात्मा मंजूर इथेनॉल प्रकल्प पुन्हा रद्द करण्याचे पाप मागील सरकारने केले अशी टीका त्यांनी केली. ही टीका अप्रत्यक्षपणे जयंत पाटील यांच्यावरच होती. या टीकेला जयंत पाटलांनी जशास-तसे उत्तर दिले. "माझा नाद करू नका' असा इशाराच दिला. या वाद विरला असतानाच कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूरला जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करून मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिले होते. त्यामुळे त्यांच्या आगमनाकडे आणि घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतू यावेळी जयंतरावांनी मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी इस्लामपूरला किती निधी दिला? असा सवाल करून वादाची फोडणी टाकली. त्यामुळे मुख्यमंत्री कोणता पलटवार करणार? याची उत्सुकता होती. 

मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळावर येण्यापूर्वी सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानी गेले होते. तेथे त्यांना जयंतरावांनी केलेल्या टीकेची माहिती मिळाली. त्यानंतर उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात शेवटी जयंतरावांच्या टीकेचा धागा पकडत श्री. फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ""इस्लामपूरला निधी किती आणला याची खरी आकडेवारी देतो. ते देखील सत्तेत होते. वित्त खाते तसेच मोठी खाती त्यांनी सांभाळली. नगरपालिकेत 31 वर्षे सत्ता असताना त्यांनी 115 कोटी रूपये आणले. परंतू आम्ही 11 महिन्यात 107 कोटी रूपये दिले. 25 कोटी रूपयाच्या पाणी योजनेलाही मान्यता दिली जाईल. माझी कोरडी चक्कर कधीच नसते.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com