sangli muncipal result | Sarkarnama

सांगली महापालिकेत कॉंग्रेस आघाडी 10 तर भाजप सहा जागांवर पुढे 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला असून पहिल्या जाहीर कलानुसार भाजप 6, कॉंग्रेस 6, राष्ट्रवादी 4, अपक्ष अल्लाउद्दीन काझी आघाडीवर आहेत. 

येथील मिरज रस्त्यावरील शासकीय गोदामात आज सकाळी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मतमोजणीस प्रारंभ झाला. सकाळी साडेअकरापासून निकाल येण्यास सुरवात होईल असा अंदाज असून दुपारी साडेतीन पर्यंत मतमोजणी पुर्ण होणे अपेक्षित आहे. 

एकूण 78 जागांसाठी 451 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून एकूण अकरा फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. सुमारे साडेतीन हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत कार्यरत होते. त्यात मतमोजणीसाठी 334 कर्मचारी व्यस्त आहेत. कॉंग्रेस सत्ताधारी आणि राष्ट्रवादी विरोधक अशी पाच वर्षे भूमिका बजवणाऱ्या दोन्ही कॉंग्रेसनी या निवडणुकीत आघाडी केली होती

. त्यांनी पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढत केली होती. भाजपने सर्व्र 78 जागांवर उमेदवार उभे केले होते. आघाडी विरुध्द भाजप असा थेट सामना आहे. तथापि शिवसेनेने 51 उमेदवार आणि पाच पुरस्कृत असे 56 उमेदवार उभे करीत ही निवडणूक त्रिकोणी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. याशिवाय जिल्हा सुधार समिती, आप पुरस्कृत लोकशाही आघाडी, अपक्ष महाविकास आघाडी यांनी रिंगणात उतरून निवडणूक चुरशीची करण्याचा प्रयत्न केला. 

आघाडी निकाल असा - 

प्रभाग क्रमांक 15 मध्ये सोनल पाटील (भाजप) आघाडीवर प्रभाग क्रमांक 12 धीरज सूर्यवंशी (भाजप) आघाडीवर 

प्रभाग क्रमांक 6 मध्ये काजी अल्लाहुदीन (अपक्ष) आघाडीवर 

प्रभाग क्रमांक 3 मध्ये सचिन कृष्णा जाधव (कॉंग्रेस) आघाडीवर 

संबंधित लेख