Sangli Miraj & Jalgaon municipal corporation voting local holiday on wednesday | Sarkarnama

सांगली-मिरज- कुपवाड व जळगाव निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारी सुट्टी

सरकारनामा
सोमवार, 30 जुलै 2018

राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठानांनाही ही अधिसूचना लागू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई : सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिका आणि जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक तसेच वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 97 च्या पोटनिवडणुकीसाठी 1 ऑगस्ट 2018 रोजी मतदान होणार आहे.

राज्य शासनाने या निवडणुकीसाठी संबंधित महानगरपालिका कार्यक्षेत्रात आणि वसई- विरार महानगरपालिकेच्या प्रभाग 97 मध्ये 1 ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

राज्य शासनाने या अनुषंगाने एक अधिसूचना जारी केली आहे. निवडणूक असलेल्या महानगरपालिकेच्या मतदार संघातील मात्र कामानिमित्त मतदार संघाच्या बाहेर असलेल्या मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सुट्टी लागू राहील.

राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठानांनाही ही अधिसूचना लागू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख