AJIT-PAWAR-
AJIT-PAWAR-

सांगली: भाजपला मते देवून जिल्ह्याचा विकास खुंटला  - अजित पवार

अजितदादा कडाडले, "मेजर ऑपरेशन'करूमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली दौऱ्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतले. या जिल्ह्यात पक्षांतर्गत एक, दोन, तीन, चार गट असल्याचं मला सांगितलं गेलं. असलं चालणार नाही. इथं एकच गट पाहिजे, तो राष्ट्रवादीचा. जमत असेल तर बघा, अन्यथा पदावरून बाजूला व्हा. तेही जमत नसेल तर मला "मेजर ऑपरेशन' करावं लागेल, असा सज्जड दम त्यांनी दिला. माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्यासमोर यांनी पक्षांतर्गत कुरघोड्यांना तडाखा दिला.अजितदादांनी "मी सांगलीचा पक्का गृहपाठ करून आलोय', याची प्रचिती दिली. राष्ट्रवादीत शहरमध्ये दोन गटांत तर जिल्ह्यात जयंतराव आणि दिवंगत आर. आर. पाटील गटात सातत्याने व जाहीरपणे खटके उडत आले आहेत. त्याबद्दल अजितदादांकडे वेळोवेळी तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत त्यांनी आज सर्वच पदाधिकाऱ्यांना फटकारले.ते म्हणाले, ""मी आज आलोय, भाषण करून निघून जाईन, पुन्हा काही केलं तरी चालतयं, अशा भ्रमात कुणी राहू नका. या घडीपासून पुढे प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतला जाईल. ज्याला काय सांगायचं आहे, त्यानं खुशाल सांगा. मी, तटकरे, जयंतराव आम्ही त्यात विचारपूर्वक दुरुस्त्या करू. त्यानंतर इथे एकच गट असला पाहिजे. ज्याला जमत नसेल त्याने पद सोडावे. त्याला मी पक्षातून काढणार नाही, कार्यकर्ता म्हणून काम करा, मात्र गटतट करणारे पदावर नकोत. हे महिला, युवक, युवती या साऱ्यांसाठी लागू आहे. त्यातूनही सुधारणा झाली नाही तर नाविलाजास्तव तुम्हाला पदावरून बाजूला करावे लागेल.या तालुक्‍याचा तो नेता भाजपमध्ये गेला, आता तेथे काही कामच नाही, असे सांगायचे बंद करा. जे कुणी उरलेत त्यांनी कामाला लागा. तुमच्यातून आपण उद्याचा आमदार, जिल्हा परिषद सदस्य तयार करू.''

सांगली : " केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. गेल्या तीन वर्षात भाजपला ताकद देण्याचे काम मतदारांनी केले. मात्र त्याबदल्यात जिल्ह्याला काय मिळाले? युतीचे पाच आमदार असतानाही जिल्ह्याचा विकास खुंटला.

इथल्या रस्त्याची, स्वच्छतेची काय अवस्था झाली आहे? कुणी वाली आहे का जिल्ह्याला? जिल्ह्याकडे सरकारचे पुर्ण दुर्लक्ष केले आहे. याचा पश्‍चाताप मतदारांना होत आहे ,"अशा शब्दात आज राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. 

सांगलीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पक्षाचा मेळावा घेण्यात आला. डेक्कन मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यात अजित पवार यांनी सरकारच्या धोरणांमुळे देशात आणि राज्यात गुंडगिरी वाढल्याचा आरोप केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार सुमन पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, जिल्ह्याच्या निरीक्षक राजलक्ष्मी भोसले, युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, सामाजिक न्याय सेलचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड आदी उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले,""इथल्या सामान्य माणसाची अवस्था काय झाली आहे याचा विचार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करावा. राष्ट्रवादी एक कुटुंब आहे. भांड्याला भांडे लागले तर आवाज किती करायचा याचे भान ठेवा. पक्षाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्या. पक्षाची बदनामी म्हणजे पवारसाहेबांची बदनामी होते लक्षात ठेवा.'' 

ते म्हणाले,""कोपर्डी प्रकरणातील आरोपीला वर्ष झाले तरी फाशी होत नाही. उत्तर प्रदेशात गोवंश हत्या बंदी कायद्यातून मुस्लीमांची घरे पेटवली जातात. सरकारच्या धोरणांमुळे गुंडगिरी वाढली.धर्माच्या नावाखाली गुंडगिरी वाढतान दिसते. असे मागे कधी होत नव्हते. गुंडगिरी रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे.'' अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली. 

संघर्ष यात्रेमुळे शेतकरी पेटून उठला आणि संप केला. त्यामुळे सरकार जागे झाले आणि कर्जमाफी केली. मात्र आजही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा नाहीत. कसली कर्जमाफी, कशाला फसवणूक करता? नोटबंदीनंतर जिल्हा बॅंकांमध्ये शेकडो कोटी रुपये बिन व्याजी पडून आहेत.

यामुळे बॅंका बंद पडतील, व्यवहार बंद पडतील आणि खासगी सावकारी वाढेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. शेतीचा आणि यांचा कुठे तरी संबंध आहे का? शेतकरी आडवा व्हायची वेळ आली आणि हे योगा करत बसलेत अशा शब्दात सरकारच्या कर्जमाफी धोरणाचा समाचार घेतला.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com