Sangharsh Yatra second phase from 15th April | Sarkarnama

संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा 15 एप्रिल पासून

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 एप्रिल 2017

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्ज मुक्तीसाठी संघर्ष यात्रा अधिक तीव्र करण्याचा निर्धार विरोधी पक्षांनी केला.15 ते 18 एप्रिलदरम्यान ही यात्रा होणार आहे.

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्ज मुक्तीसाठी संघर्ष यात्रा अधिक तीव्र करण्याचा निर्धार विरोधी पक्षांनी केला.15 ते 18 एप्रिलदरम्यान ही यात्रा होणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती करण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह विरोधकांनी राज्य सरकारकडे लावून धरली असताना यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची धार अधिक तीव्र करण्यात आली. सत्तांतर झाल्यापासून राज्य विधिमंडळाची आठ अधिवेशने झाली मात्र याच मागणीसाठी विरोधकांची एकी दिसून आली, गेल्या 6 मार्चपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मात्र विरोधक पूर्ण जोमाने उतरले. यासाठी 19 आमदार निलंबित झाले तरी त्यांनी कर्ज माफीची मागणी शेवटपर्यंत कायम ठेवली.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी पार्टी तसेच शेकाप व अन्य पक्षांनी यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन केले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या निवास स्थानी झालेल्या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. 15 ते 18 एप्रिलच्या कालावधीत बुलढण्याच्या सिंदखेड राजा येथील जिजाऊंच्या स्मारकाला अभिवादन करून संघर्ष यात्रा सुरू होईल, पहिल्याच टप्प्यात राहिलेले जिल्हे आणि संपूर्ण मराठवाड्यातील सर्व जिह्यात यात्रा पोहोचेल, संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणचा समावेश असेल मात्र याची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

संबंधित लेख