sangali-jayant-patil | Sarkarnama

सरकारबद्दल समाजांमध्ये मोठा असंतोष :   जयंत पाटील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 जुलै 2018

आषाढी एकादशीला राज्याच्या प्रमुखाने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शासकीय पुजा करण्याची परंपरा आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या समाजाला अनेक आश्‍वासने दिली. मात्र त्याची पुर्तता झालेली नाही. त्यामुळे सर्व समाजांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. त्याची प्रतिक्रिया उमटण्याची शक्‍यता असल्याने मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या पुजेला जाऊ शकत नाहीत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज हाणला.  

सांगली : आषाढी एकादशीला राज्याच्या प्रमुखाने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शासकीय पुजा करण्याची परंपरा आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या समाजाला अनेक आश्‍वासने दिली. मात्र त्याची पुर्तता झालेली नाही. त्यामुळे सर्व समाजांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. त्याची प्रतिक्रिया उमटण्याची शक्‍यता असल्याने मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या पुजेला जाऊ शकत नाहीत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज हाणला.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आषाढ एकादशीला शासकीय पुजेसाठी पंढरपूरला जाण्याचे रद्द केले. यावर सांगलीत पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पुजेसाठी जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे आता विविध समाजातील समस्यांवर मात करण्यासाठी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना वारकऱ्यांच्या माध्यमातून करणे आपल्या हातात आहे. 

मुख्यमंत्र्यांनी तेथे जाणे आवश्‍यक होते. मात्र सरकारने मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत या समाजांना दिलेल्या आश्‍वासनांना हरताळ फासला आहे. त्यामुळे राज्य सरकारबद्दल या समाजांमधून असंतोष व्यक्त होत आहे, असे ते म्हणाले.
 

संबंधित लेख