sandeep kshirsagar | Sarkarnama

आजचा वाढदिवस : संदीप रविंद्र क्षीरसागर

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 ऑगस्ट 2017

बीड जिल्ह्याच्या राजकारणातील क्षीरसागर या मातब्बर घराण्यातील संदीप रविंद्र क्षीरसागर हे तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या संदीप क्षीरसागरांनी पाच वर्षे बीड पंचायत समितीचे तर पाच वर्षे जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून काम पाहिले. शिक्षण व आरोग्य तसेच सार्वजनिक बांधकाम आणि अर्थ या महत्वाच्या समित्यांचे त्यांनी नेतृत्व केले. नगर पालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळातील उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.

बीड जिल्ह्याच्या राजकारणातील क्षीरसागर या मातब्बर घराण्यातील संदीप रविंद्र क्षीरसागर हे तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या संदीप क्षीरसागरांनी पाच वर्षे बीड पंचायत समितीचे तर पाच वर्षे जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून काम पाहिले. शिक्षण व आरोग्य तसेच सार्वजनिक बांधकाम आणि अर्थ या महत्वाच्या समित्यांचे त्यांनी नेतृत्व केले. नगर पालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळातील उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर या दोन्ही काकांच्या विरोधात बंड पुकारत त्यांनी काकू नाना आघाडीच्या झेंड्याखाली स्वबळावर निवडणुक लढवली. नगर पालिकेच्या उपाध्यक्षपदासह सर्व सभापतीपदे त्यांच्या नेतृत्वाखालील काकू नाना आघाडीकडे आहेत. जिल्हा परिषदही स्वतंत्र लढवून त्यांच्यासह तीन सदस्य आहेत. 

संबंधित लेख