sandeep deshpande udhav thackray speech pandharpur | Sarkarnama

उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगा, 151 रूपये मिळवा, मनसेच्या देशपांडेंकडून बक्षिस जाहीर 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरात जे भाषण केले त्याचा अर्थ सांगा आणि 151 रुपये मिळवा असे बक्षिस मनसेचे संदीप देशपांडे यांनी जाहीर केले आहे. 

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरात जे भाषण केले त्याचा अर्थ सांगा आणि 151 रुपये मिळवा असे बक्षिस मनसेचे संदीप देशपांडे यांनी जाहीर केले आहे. 

एकीकडे उद्धव ठाकरे म्हटले होते की 25 वर्षे युतीमध्ये राहून शिवसेना सडली. त्यानंतर युती होणार नाही असेही त्यांनी सांगितले. मात्र पंढरपूरमध्ये बोलताना युतीचा निर्णय जनताच घेणार असे म्हटले. त्यांच्या या वेगळ्या वक्तव्यातून नेमका काय अर्थ काढायचा हे आम्हाला तरी कळत नाही. त्यांच्या भाषणाचे विश्‍लेषण आणि अर्थ जो कोणी आम्हाला समजावून सांगेल त्याला आम्ही 151 रुपये बक्षीस देत आहोत अशी खोचक प्रतिक्रिया मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. 

पंढरपूरमध्ये ठाकरे यांनी पंढरपुरातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. मात्र युतीचा निर्णय जनताच घेईल असे म्हणत त्यावरचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्याचमुळे देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. 

युती करायची की नाही याचा निर्णय जनताच घेईल, जागावाटपाशी आम्हाला घेणेदेणे नाही. त्याचं काय करायचं ते आपण नंतर पाहू असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी पंढरपूरमध्ये झालेल्या भाषणात केले. त्यांच्या या वक्तव्याचा आणि आधी केलेल्या वक्तव्यांचा संदर्भ जोडत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगा आणि 151 रुपये मिळवा असा खोचक टोला लगावला आहे.  

संबंधित लेख