Sambhajiraje - Mahadik
Sambhajiraje - Mahadik

संभाजीराजेंकडून महाडीकांनाही गुलाबपुष्प

कोल्हापूर:कोल्हापुरची विमानसेवा सुरू व्हावी म्हणून श्रेयवादात अडकलेले राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक व राज्यसभा सदस्य संभाजीराजे हे मंगळवारीविमानतळावरच आमनेसामने आले आणि संभाजीराजे यांनी पहिल्या विमानातून आलेल्या श्री. महाडीक यांना पुष्प देऊन स्वागत केले.

कोल्हापूर :कोल्हापुरची विमानसेवा सुरू व्हावी म्हणून श्रेयवादात अडकलेले राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक व राज्यसभा सदस्य संभाजीराजे हे मंगळवारी  विमानतळावरच आमनेसामने आले आणि संभाजीराजे यांनी पहिल्या विमानातून आलेल्या श्री. महाडीक यांना पुष्प देऊन स्वागत केले.

गेल्या सहा वर्षापासून कोल्हापुरची विमानसेवा बंद आहे. ही सेवा सुरू व्हावी म्हणून गेल्या चार वर्षापासून श्री. महाडीक यांचे प्रयत्न सुरू आहेत, त्यात दोन वर्षापासून संभाजीराजे यांची भर पडली. श्री. महाडीक कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना संभाजीराजे यांनी थेट कंपनीच्या मालकांचीच भेट घेऊन विमानसेवा सुरू करण्याची विनंती केली. या दोघांत विमानसेवेसाठी श्रेयवाद रंगला असताना प्रत्यक्ष विमानसेवा काय सुरू झाली नव्हती.

गेल्या आठवड्यात एअर डेक्कन कंपनीने विमान सुरू करण्याची तयारी दर्शवून चाचणीही घेतली. आज प्रत्यक्ष विमानसेवा सुरू झाला. पहिल्याच विमानातून कोल्हापुरातील 18 उद्योजकांसह श्री. महाडीक मुंबईहून कोल्हापुरात आले. पहिल्या प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी संभाजीराजे यांच्यासह श्री. महाडीक यांच्या पत्नी सौ. अरूंधती याही विमानतळावर उपस्थित होत्या. सर्वांना गुलाब पुष्प देऊन संभाजीराजे यांनी स्वागत केले. विमानतळाबाहेर श्री. महाडीक येताच त्यांनाही संभाजीराजे यांनी पुष्प देऊन स्वागत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com