samrudhi road | Sarkarnama

"समृद्धी महामार्गा'च्या विरोधात शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मे 2017

औरंगाबाद : नागपूर-मुंबई महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी त्यांचा विरोध असताना ताब्यात घेण्याचा उद्दामपणा प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सरकारकडे आक्षेप नोंदवलेले असताना त्याची सुनावणी न घेताच धाकदपटशा करत शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी केली जात आहे. या धसक्‍याने आतापर्यंत तीन शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले आहे. हे प्रकार तत्काळ थांबवा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून मुजोर प्रशासनाला धडा शिकवेल असा इशारा शिवसेनेने दिला आहे. 

औरंगाबाद तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेऊन समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास आपला विरोध दर्शवला.

प्रधान सचिव व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या आक्षेपांना केराची टोपली दाखवत प्रशासनाने दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केला. पोलिसी बळाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या बागायती जमिनींची मोजणी केली जात असल्याचे देखील शेतकऱ्यांनी यावेळी विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. 
शिवसेना मुकाबला करेल 
शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी त्यांचा विरोध असताना प्रशासन ताब्यात घेत असेल तर शिवसेना हे कदापी सहन करणार नाही.

शिवसेना विकासाच्या विरोधात नाही, पण शेतकऱ्यांचे नुकसान होणार असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. दबाव आणि पोलिसी बळाचा वापर करून जमिनीची मोजणी व ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिवसेना आपल्या पद्धतीने धडा शिकवेल असा इशारा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिला आहे. 

संबंधित लेख