samrudhi mahamarg and thakare | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांविषयी प्रेम असते तर आतापर्यंत समृद्धी महामार्गाला नाव दिले असते : जयंत पाटील

श्रीकांत पाचकवडे
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रेम असतं तर त्यांनी याआधीच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव दिले असते. मात्र, तशी परिस्थिती असल्याचे दिसत नाही, त्यामुळे शिवसेनेच्या मागणीला झुलवत ठेवण्यात येत असल्याचा टोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी लगावला. 

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रेम असतं तर त्यांनी याआधीच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव दिले असते. मात्र, तशी परिस्थिती असल्याचे दिसत नाही, त्यामुळे शिवसेनेच्या मागणीला झुलवत ठेवण्यात येत असल्याचा टोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी लगावला. 

शिवसेनेने बाळासाहेबांचे नाव द्या, अशी विनंती करायची आणि मग उपकाराखातर भाजपने नाव द्यावं, हे जरा दिसायला बरं दिसत नाही, असा चिमटाही जयंत पाटील यांनी शिवसेनेला काढला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवार (ता.17) जिल्हातील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद झाला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डॉ. संतोषदादा कोरपे, जिल्हा प्रभरी बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे, प्रदेश प्रवक्‍त्या डॉ. आशा मिरगे, माजी जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, प्रदेश महासचिव श्रीकांत पिसे पाटील, महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी जयंत पाटील म्हणाले, की समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने सरकारकडे केली आहे. मुळात मागणी करण्याचे काहीच काम नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात बाळासाहेबांविषयी प्रेम असते तर त्यांनी याआधीच या महामार्गाला बाळासाहेबांचे नाव दिले असते. मात्र, तशी परिस्थिती सध्या दिसत नाही. महामार्गाला नाव देण्यावरून दोन्ही पक्षात राजकारण सुरू आहे. मुळात या महामार्गात कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला असून सत्ताधाऱ्यांच्या बगलबच्यांनी कमी किमतीत जमिनी खरेदी करून सरकारला वाढीव दरात दिल्या आहेत. यात सत्ताधाऱ्यांच्या जवळचे अनेक आयएएस अधिकारी, व्यापारी, उद्योजकांचा समावेश असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. 

या महामार्गासाठी जमिनी देणाऱ्या मुळ मालकाला तोकडी नुकसानभरपाई देण्यात आली असून दलालांच्या साखळीनेच कोट्यावधीचा मलीदा लाटला असल्याचे पाटील म्हणाले. समृद्धी महामार्गाचा 40 हजार कोटीच्या प्रोजेक्‍टची सुधारीत किंमत 50 हजार कोटी केली आहे. या महामार्गाच्या कामात कोणत्या आणि किती लोकांना नुकसानभरपाई दिली त्यांची नावे सरकारने जाहीर करावे, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 

संबंधित लेख