समृद्धी विरोधाचे लोण राज्यभर पसरणार ?

समृद्धी विरोधाचे लोण राज्यभर पसरणार ?

नाशिक : समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनात प्रशासनाकडून दडपशाही सुरू असल्याने सिन्नर, इगतपुरी तालुक्‍यातील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. त्यात विविध संघटना सक्रिय झाल्यावर आता त्याचे लोण राज्यातील दहा जिल्ह्यांत पसरणार आहे. त्यासाठी येत्या 26 एप्रिलला शहापूर येथे आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. 

नाशिकमधल्या शिवडे गावानंतर आता समृद्धी महामार्गा विरोधातील आंदोलनाचं लोण इतरही जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये पोहचलंय. 10 जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक गावांनी समृद्धी महामार्गाच्या विरोधात एल्गार पुकारलाय. या गावातल्या शेतकरी प्रतिनिधींची बैठक शिवडे गावात पार झाली. यावेळी ठाणे, नाशिक, नगर, औरंगाबाद सह 10 जिल्ह्यांतील शेतक-यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कुठल्याही परिस्थितीत समृद्धी महामार्गासाठी बागायती जमिनी द्यायच्या नाही असा ठराव या बैठकीत एकमतानं करण्यात आला. समृद्धी महामार्ग विरोधी आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून ठाणे, नाशिक, नगर, औरंगाबाद सह 10 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र आलेत. मुंबईहून औरंगाबादला जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गासह 3 मोठे महामार्ग उपलब्ध आहेत. त्यांचा विकास करण्याऐवजी हजारो शेतक-यांना देशोधडीला लावणा-या समृद्धी महामार्गाचा घाट का घातला जातोय असा सवाल या समितीनं केलाय. 26 एप्रिलला शहापूर इथं दहाही जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन जनआंदोलन उभं करणार आहेत. त्याचं नियोजनही या बैठकीत करण्यात आलं. या बैठकीच्या दरम्यान राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांनी शेतक-यांशी संवाद साधला. 
शिवसेना शेतकऱ्यांबरोबर ः गोडसे 
दरम्यान शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी शिवडे भागात शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. सरकार दडपशाही करीत असल्याने माघार न घेता शिवसेना आक्रमकपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार असल्याचे घोषित केले. याउलट भाजप नेत्यांचे यावर मौन आहे. त्यामुळे शिवसेनेला आयता मुद्दा मिळाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com