sampatkumar upset in aurangabad | Sarkarnama

अब्दुल सत्तार 'ऐसा क्‍यु कह रहे है'?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

औरंगाबादः कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि मराठवाडा सहप्रभारी संपत कुमार काल जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर नाराज झाले.

औरंगाबादः कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि मराठवाडा सहप्रभारी संपत कुमार काल जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर नाराज झाले.

संपत कुमार यांच्या मराठवाडा दौऱ्याला औरंगाबादेतून सुरूवात झाली. ही बैठक संपवून त्यांना जालन्याला जायचे होते. पण पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्‍नाला ते मनमोकळेपणाने उत्तरे देत होते. पण जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी मध्ये पत्रकारांना उद्देशून "किती प्रश्‍न विचारता, त्यांना जायला उशीर होतोय, तुम्हाला किती प्रश्‍न विचारायचे ते मला विचारा, मी सगळ्या प्रश्‍नांची उत्तर देतो' असे म्हणत हस्तक्षेप केला. त्यामुळे संपत कुमार नाराज झाले आणि त्यांनी शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्याकडे 'ये ऐसा क्‍यु कह रहे है' अशी नाराजी व्यक्त केली.

संबंधित लेख