नेते घडविणाऱ्या संभाजीराव काकडे यांचा आज पुण्यात गौरव

पुणे : जनता पक्षाची प्रदीर्घ काळ धुरा सांभाळणारे व राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना घडविणारे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचा रविवारी 28 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता पुण्यात सत्कार होत आहे.
Kakde.
Kakde.

पुणे : जनता पक्षाची प्रदीर्घ काळ  धुरा सांभाळणारे  व राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना घडविणारे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचा उद्या रविवारी 28 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता पुण्यात सत्कार होत आहे. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणाऱ्या या गौरव समारंभाला डॉ. डी. वाय. पाटील हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यकर्त्यांमध्ये 'लाला' या नावाने लोकप्रिय असलेले संभाजीराव हे गेली काही वर्षे राजकीय घडामोडींपासून अलिप्त आहेत मात्र त्यांचे राजकीय घटना घडामोडीवर बारकाईने लक्ष असते . सल्लामसलती साठी आणि त्यांचे अनुभवाचे बोल ऐकण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्याच्याकडे आवर्जून येत असतात .   त्यांच्या सत्कारामुळे 'लालाप्रेमीं'मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

बारामती तालुक्‍यातील काकडे घराणे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मातब्बर घराणे मानले जाते. संभाजीराव यांनी राज्यस्तरावर आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवत अनेक कार्यकर्ते घडविले . माजी मंत्री बबनराव पाचपुते, बबनराव ढाकणे, कै. किसनराव बानखेले, संभाजीराव पवार आदींचा यात समावेश आहे. 

संभाजीराव हे पहिल्यांदा 1971 मध्ये विधान परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळचे कॉंग्रेसचे मातब्बर रंगराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. ही निवडणूक काकडे यांनी अपक्ष म्हणून लढविली होती. यशवंतराव चव्हाण यांनी रंगराव पाटील यांच्यासाठी प्रयत्न करूनही काकडे त्यावेळी निवडून आले होते.

1978 तसेच 1982 साली ते बारामती लोकसभा मतदासंघातून लोकसभेवर निवडून गेले. महाराष्ट्राच्या राजकारणात त्याकाळी संभाजीराव काकडे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर विरोधक मानले जात असत .

काकडे हे सुरवातीला सिंडीकेट कॉंग्रेस, नंतर जनता पक्ष तसेच जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष होते. माजी पंतप्रधान विश्‍वनाथ प्रतापसिंग यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. या कार्यक्रमाला  संभाजीराव काकडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी  उपस्थित राहावे, असे आवाहन संभाजीराव काकडे गौरव समितीचे अध्यक्ष प्रकाश भोईटे यांनी केले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com