sambhajiraje and malegaon | Sarkarnama

शिवसेनेच्या घोषणाबाजीमुळे छत्रपती संभाजीराजे उद्‌घाटनाशिवाय परतले ...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 17 सप्टेंबर 2017

मालेगाव : राज्यमंत्री दादा भुसे आणि आमदार अद्वय हिरे यांच्या राजकीय वादाचा तालुक्‍यातील विकासकामांवर परिणाम होत आहे. आज हिरे गटाच्या निमंत्रणावरुन पंचायत समितीच्या इमारतीच्या उद्‌घाटनासाठी आलेले खासदार छत्रपती संभाजीराजे यांनाही त्याची झळ बसली. यावेळी श्रेयवादावरुन शिवसेनेकडून झालेल्या घोषणाबाजीने संभाजीराजेंना उद्‌घाटन न करताच परतावे लागले. त्यामुळे मालेगावमध्ये एका नव्या राजकीय वादाची पेरणी झाली. 

मालेगाव पंचायत समितीवर यापूर्वी सलग पंधरा वर्षे दादा भुसे गटाची सत्ता होती. गेल्या पंचवार्षिक कालावधीत त्यांनी विशेष पाठपुरावा करुन पंचायत समितीच्या इमारत मंजुरीचे व बांधकामाचे काम पूर्ण केले होते. उद्‌घाटनाची सर्व तयारी देखील झाली होती. त्यासाठी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाच्या कोनशीलाही बसविण्यात आल्या होत्या. मात्र त्याचदिवशी आचारसंहिता लागू झाली आणि उद्‌घाटन लांबले. निवडणुकीत भुसे अर्थात शिवसेना आणि माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे या दोघांचेही प्रत्येकी सहा सदस्य निवडून आले. या वादात सहा सदस्य असलेले सत्तेबाहेर तर राष्ट्रवादीच्या एकमेव सदस्या व छगन भुजबळ यांच्या समर्थक प्रतिभा सूर्यवंशी सभापती तर अपक्ष अनिल तेजा उपसभापती बनले. दोन्ही गटाचा वाद त्यानंतरही सुरुच असून दोन्ही सदस्य एकमेकांच्या कार्यक्रमाला पाठ दाखवतात. 

पंचायत समितीच्या इमारतीचे उद्‌घाटन छत्रपती संभाजी राजेंच्या हस्ते करण्याचे नियोजन हिरे गटाकडून करण्यात आले होते. मात्र संभाजीराजे कार्यक्रमाला पोहोचताच शिवसेनेच्या समर्थकांनी छत्रपतींना विरोध नाही. मात्र इमारतीचे काम व कार्यक्रमाचे श्रेय घेणाऱ्या हिरेंना प्रखर विरोध आहे. त्यामुळे उद्‌घाटन करु नये असे स्पष्ट केले. यावेळी दोन्ही बाजूंकडून प्रचंड घोषणाबाजी झाली. या वादात राजकीय तपमान एव्हढे तापले की छत्रपती संभाजी राजे उद्‌घाटन न करताच परतले. त्यामुळे दोन्ही गटांतील वादाला नवे वळण मिळणार हे स्पष्ट आहे. 

संबंधित लेख