Sambhaji Patil Nilangekar Advises Pasha Patel to Work in Delhi | Sarkarnama

पाशा पटेल तुम्ही दिल्लीतच काम करा : पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचा सल्ला

हरी तुगावकर
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

लातूर जिल्ह्याचे नव्हे तर एकाच निलंगा तालुक्यातील हे दोन्ही नेते पक्षात मोठे आहेत. पण जिल्ह्यात मात्र ते दोघे फारसे एकत्र दिसत नाहीत.  निलंगेकर यांच्या कार्यक्रमात पटेल नसतात तर पटेल यांच्या कार्यक्रमाला निलंगेकर नसतात. दोघांची वाटही वेगळी आहे. कार्यक्रमांच्या पोस्टरवरही दोघांचे एकत्रित चित्र फारसे दिसत नाही. कधी तरी एका व्यासपीठावर आल्यानंतर मात्र एकमेकांचे चिमटे मात्र ते घेताना दिसतात.

लातूर : पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष हे दोन्ही भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. पण जिल्ह्यात फारसे ते एका व्यासपीठावर दिसत नाहीत. कार्यक्रमांच्या पोस्टवरही दोघांचे फोटोही फारसे दिसत नाहीत. यातूनच दोघांचे किती सख्य आहे हे लातूरकर पाहत आहेत. पण कधी तरी एखाद्या व्यासापीठावर ते आले की एकमेकांना राजकीय चिमटे काढल्याशिवाय राहत नाहीत. 

असेच गुरुवारी (ता. २३)येथे झालेल्या एका कार्यक्रमात हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले. यात निलंगेकर यांनी पटेल यांना दिल्लीतच काम करण्याचा सल्ला पुन्हा एकदा दिला.

लातूर जिल्ह्याचे नव्हे तर एकाच निलंगा तालुक्यातील हे दोन्ही नेते पक्षात मोठे आहेत. पण जिल्ह्यात मात्र ते दोघे फारसे एकत्र दिसत नाहीत.  निलंगेकर यांच्या कार्यक्रमात पटेल नसतात तर पटेल यांच्या कार्यक्रमाला निलंगेकर नसतात. दोघांची वाटही वेगळी आहे. कार्यक्रमांच्या पोस्टरवरही दोघांचे एकत्रित चित्र फारसे दिसत नाही. कधी तरी एका व्यासपीठावर आल्यानंतर मात्र एकमेकांचे चिमटे मात्र ते घेताना दिसतात.

जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेच्या वतीने आयोजित जलयुक्त शिवार अभियानाच्या कार्यशाळेत हे दोघे एका व्यासपीठावर आले होते. यात पहिल्यांदा पटेल यांचे भाषण झाले. यात त्यांनी टेकड्यांवर वृक्ष लागवड करण्यासाठी आमदारांनी निधी देवून पॅटर्न निर्माण करावा.  निलंगेकर यांनी तर दोन्ही हातानी हा निधी द्यावा, निलंगा मतदारसंघातच एक टेकडी निवडून हे काम करावे असा सल्ला दिला होता. यावर निलंगेकर यांनी देखील पटेल यांची फिरकी घेतली.

पंतप्रधानांसमोर शेतकऱ्यांची भूमिका तुम्ही मांडली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आता तुमचे राज्यात काम नाही. देशाच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व्हा .तुम्ही दिल्लीतच काम करा असा सल्ला त्यांनी दिला. त्यांचा हा सल्ला म्हणजे पटेल यांचे जिल्ह्यात किंवा राज्यात काही काम नाही अशाच प्रकारचा आहे, अशी चर्चा उपस्थितांत राहिली.

संबंधित लेख