Sambhaji brigade takes aggressive stand against wine shops | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी घेणार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट
राजस्थानमध्ये काॅंग्रेस 91 तर भाजप 70 जागांवर आघाडीवर
रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजिनामा
अहमदनगर निकाल - भाजप - 14, शिवसेना - 22, राष्ट्रवादी - 20, कॉंग्रेस - 5, बसप - 4, सपा - 1, अपक्ष - 2
मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई हायकोर्ट परिसरात हल्ला
ब्रम्हपुरी नगरपरिषद- नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेल्या काँग्रेसच्या उमेदवार सौ. रिताताई दीपक उराडे यांचा ८०२० मतांनी विजय
रिसोड नगरपरिषद - नगराध्यक्ष पदी जन विकास आघाडीच्या विजयमाला आसनकर विजयी
लोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत, 17 पैकी 13 जागी भाजप विजयी, नगराध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवार विजयी, काँग्रेस चार जागी विजयी

अकोल्यात दारू दुकानावर नेत्यांचा हल्लाबोल

सरकारनामा ब्युराे
गुरुवार, 4 मे 2017

प्रशासनाशी संगमत करुन महानगरातील गाैरक्षण मार्गावर अनेक मद्यसम्राटांनी अापली दुकाने थाटली. यासाठी महापालिका प्रशासनाची परवानगी न घेताच काहींनी अनधिकृत इमारतींमध्ये दुकाने सुरू केली अाहेत.

अकाेला :  महानगरातील गाैरक्षण मार्गावर स्थलांतरीत करण्यात अालेल्या दारू दुकानांमुळे सामाजिक स्वास्थ बिघडत असल्याने या दुकानाविरुद्ध संभाजी ब्रिगेड, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरूवारी (ता.चार) हल्लाबाेल अांदाेलन केले. यावेळी अनेक कार्यकर्ते दुकानासमाेर येऊन अाक्रमक हाेत घाेषणाबाजी करत असतांना त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.

राज्य व राष्ट्रीय महार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या अात असलेली दारूची दुकाने बंद करण्याचे अादेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले. या अादेशामुळे महानगरातील सुमारे 180 च्यावर दारूची दुकाने बंद झाली. ही दुकाने राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून लांब स्थलांतरीत करण्याचा सपाटा मद्य सम्राटांनी सुरू केला.

प्रशासनाशी संगमत करुन महानगरातील गाैरक्षण मार्गावर अनेक मद्यसम्राटांनी अापली दुकाने थाटली. यासाठी महापालिका प्रशासनाची परवानगी न घेताच काहींनी अनधिकृत इमारतींमध्ये दुकाने सुरू केली अाहेत.

त्यामुळे रस्त्यावर मद्यपींची दुकानासमाेर माेठी गर्दी हाेत असून त्यांची वाहने रस्त्यावरच उभी करण्यात येत असल्याने या मार्गावर ये-जा करणाऱ्या महिला, युवती, विद्यार्थीनींसह अाबालवृद्धांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत अाहे.

परिसरात मद्यपींचा हैदाेस वाढत असून वाद-विवाद वाढल्याने सामाजिक स्वास्थ धाेक्यात अाले अाहे. त्यामुळे या मार्गावरील दारू विक्रीची दुकाने बंद करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, मनसेचे महानगराध्यक्ष पंकज साबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय गावंडे यांच्यासह शेकडाे नागरिकांनी स्वाक्षरी अभियान राबविले.

मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून या दारू दुकानांना अभय मिळत असल्याने परिसरात व्यापार बंदची हाक देण्यात अाली. गुरूवारी संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले, मनसेचे महानगराध्यक्ष पंकज साबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय गावंडे, निशीकांत बडगे, याेगेश थाेरात, वैभव तायडे, अाेंकार शुक्ला अादींनी या दारु दुकानांवर धडक देत दुकाने तातडीने बंद करण्याच्या मागणीसाठी घाेषणाबाजी केली. या अांदाेलनाची माहिती मिळताच पाेलिसांनी अांदाेनकर्त्यांना ताब्यात घेतले.
 

संबंधित लेख