sambhaji brigade alleges vinayak mete | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

विनायक मेटेंच्या प्रसिद्धीच्या सोसमुळे शिवप्रेमीचा बळी : संभाजी ब्रिगेडचा आरोप

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

पुणे : शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या प्रसिद्धीच्या हव्यासामुळे एका दु्र्देवी तरुणाचा बळी गेल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. अरबी समुद्रात उभारवायाच्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी निघालेल्या बोटीला अपघात झाल्याने मेटेंवर टिकेचा रोख वळविण्यात आला आहे.

याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या निवेदनात मेटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक व्हावे, ही सरकारची इच्छाशक्ती व नियत नाही. सरकार या स्मारकाचे केवळ राजकारण करत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

साडेचार वर्षात शिवस्मारक होऊ शकत नाही, मात्र शिवप्रेमींचा जीव जातो हा बेजबाबदारपणा कोणाचा आहे, असा सवाल संभाजी ब्रिगेडने विचारला आहे. मेटे यांच्या हव्यासापोटी सिध्देश पवारचा जीव गेला. सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस व मेटे यांनी राजीनामा द्यावा. विनायक मेटे यांनी काम सुरू करण्याचा प्रसिद्धीसाठी इव्हेंट केला. समुद्रात जाऊन तिथे प्रसिद्धी मिळावी म्हणून सुरक्षेला दुय्यम स्थान देण्यात आले, असा आरोप यात करण्यात आला आहे.

संबंधित लेख