sambhaji bhide and nashik | Sarkarnama

संभाजी भिडे यांना सशर्त जामीन मंजूर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नाशिक : आपल्या शेतातील आंबा खाल्याने मुलगाच होतो असे वक्तव्य आपल्या भाषणात केलेल्या संभाजीराव भिडे यांना नाशिक न्यायालयाने आज सशर्त जामीन मंजूर केला. शिवप्रतिष्ठान या हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख असलेल्या संभाजीराव भिडे यांनी आपल्या भाषणात आपल्या बागेतील फळे खाल्यास केवळ मुलगाच होतो असा दावा केला होता. 

या प्रकरणी आरोग्य विभागाने त्यांना नोटीस पाठवली होती, मात्र ती त्यांनी स्वीकारली नव्हती. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यावर ते गेले सहा महिने न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिले नव्हते. आज न्यायालयात हजर झाल्यावर त्यांचे वकील अविनाश भिडे यांच्यावतीने त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्यांना 15 हजार रुपये भरण्यास सांगून सशर्त जामिन मंजूर केला. सरकारी वकीलांनी त्यांच्या जामिनास यावेळी विरोध केला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख