औरंगाबाद : राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना आजोबा माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, वडील स्व. दिलीपराव पाटील निलंगेकर आई माजी खासदार रुपाताई निलंगेकर यांच्याकडून संभाजी पाटील यांना राजकीय वारसा मिळाला.
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते सदस्य होते.भाजयुमोचे अध्यक्ष आणि भाजपचे महासचिव म्हणून देखील कार्यरत होते. 2004-2009 च्या विधानसभा निवडणुकीत संभाजी पाटील यांनी आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पराभव केला होता. पुन्हा 2014 मध्ये ते याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली महानगर पालिका आणि जिल्हा परिषद त्यांनी ताब्यात घेतली. तत्पूर्वी 2016 मध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांचा कामगार व कौशल्य विकास मंत्री म्हणून समावेश करण्यात आला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.