वीरश्रीयुक्त भाषणे व धमक्‍यांनी  जनतेचे कान विटले : उद्धव ठाकरे 

वीरश्रीयुक्त भाषणे व धमक्‍यांनी  जनतेचे कान विटले : उद्धव ठाकरे 

मुंबई : संपूर्ण देशात नवी करप्रणाली जीएसटी लागू झाली व त्याचा ऐतिहासिक सोहळा संसदेत पार पडला, पण ही जीएसटी काश्‍मीरात लागू होऊ शकली नाही. कारण तिथे आजही 370 कलमाची मस्ती सुरूच आहे. अतिरेकी व पाकडयांना कडक संदेश द्यायचा असेल तर पुढच्या आठ दिवसांत कलम हटवून कश्‍मीर हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग असल्याचे जगाला दाखवून द्या. वीरश्रीयुक्त भाषणे व धमक्‍यांनी जनतेचे कान विटले आहेत, असा टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच केली आहे. "हिंमतवाल्यांचे राज्य " या मथळ्याखाली शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनात लिहलेल्या अग्रलेखात केंद्र सरकारचा आपल्या नेहमीच्या शैलीत समाचारच घेतला आहे. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणातात, "" केंद्रात मोदींचे मजबूत व जम्मू-कश्‍मीरात "पीडीपी'. भारतीय जनता पक्षाचे पोलादी राज्य असताना रक्तपाताचा महापूर यावा याची चिंता आम्हाला आहे. काश्‍मीर खोऱ्यात आज कोणाचेही राज्य नसून तिथे दहशतवाद व हिंसाचाराचे थैमान घालणारे अतिरेक्‍यांचे सरकार सुरू आहे. हे अतिरेक्‍यांचे सरकार खतम करण्यासाठी आज 36 इंच पोलादी छातीचे राज्य हवे. मोदी यांच्या रूपाने ते लोकांनी आणले असले तरी कश्‍मीरातील जवानांचे हौतात्म्य व निरपराध्यांचारक्तपात का थांबलेला नाही असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे विचारतात, " कश्‍मीरातील पाक झिंदाबादच्या घोषणा थांबलेल्या नाहीत व लष्करी जवान हे हिंदुस्थानचे कुत्रे आहेत अशी देशद्रोही भावना त्या ठिकाणी वाढीस लागली आहे. मग तिथे बदलले काय ? " उद्धव ठाकरे पुढे लिहतात, " देशाला ऍक्‍शन हवी आहे व त्यासाठी पंतप्रधानांच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल. आज देशाला खरे तर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com