भाजपनेच "स्वाभिमानी' फोडली : उद्धव ठाकरे 

भाजपनेच "स्वाभिमानी' फोडली : उद्धव ठाकरे 

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वतः नरेंद्र मोदी यांनी राजू शेट्टी यांचा पाठिंबा मागितला होता. त्या बदल्यात सत्ता येताच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचे वचन दिले होते. ते वचनही हवेत विरले. उलट महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटना फोडण्याचे काम भाजपने केले,असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

"राजू शेट्टी बाहेर ! " या मथळ्याखाली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने राजू शेटी बाहेर ! असा अग्रलेख लिहिला असून स्वाभिमानीच्या फूटीला भाजपला जबाबदार धरण्यात आले आहे. 

उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे, की सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणून सरकारात गेले व आज ते भाजपचे हस्तक व राजू शेट्टी यांचे वैरी बनले आहेत. भाजपचा हा आवडता छंद आहे व बहुधा त्याच छंदास कंटाळून राजू शेट्टी यांनी "रालोआ'चा त्याग केलेला दिसतोय. त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. 

ते पुढे लिहतात, " राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील सत्तेतून बाहेर पडली आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनही हा पक्ष बाहेर पडला आहे. शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. सध्याचे सरकार शेतकऱ्यांचे हित जपत नसल्याचे त्यांचे मत आहे. कर्जमाफीची घोषणा हे राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून केलेले ढोंग आहे व शेतकऱ्यांना त्यातून काहीच लाभ होत नसल्याचे परखड मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेली भूमिका योग्यच आहे. 

" कर्जमुक्ती हा एक फार्स ठरत आहे व तुमच्या त्या ऑनलाइन वगैरेच्या पारदर्शी गुंत्यात कर्जमुक्ती अडकून पडली आहे. सहकारी बॅंकांत खडखडाट आहे व तातडीची उचल म्हणून शेतकऱ्यांना जे सरसकट दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते. ते सुद्धा शेतकऱ्यांच्या हातात पडलेले दिसत नाही. सहकारी बॅंकांनी कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी. म्हणजे नेमक्‍या किती लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला ते कळेल. त्यासाठी शिवसेनेने मध्यंतरी सर्व जिल्हा सहकारी बॅंकांसमोर ढोल वाजवून जागे करण्याचे आंदोलन केले असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com