salgar criticizes jankar, shinde | Sarkarnama

राम शिंदे, महादेव जानकरांची  धनगर आरक्षणावर दातखीळ : सलगर

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

सोलापूर : सत्तेवर बसलेल्या मंत्री राम शिंदे व महादेव जानकर हे धनगर आरक्षणाबद्दल का बोलत नाहीत? सत्ता मिळविण्यासाठी त्यांनी धनगर समाजाचा उपयोग केला परंतु सत्तेत आल्यावर त्यांची दातखीळ बसल्याचा टोला राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी लगावला. सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्या बोलत होत्या.

नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतकऱ्याला चारा नसेल तर आपली जनावरे पाहुण्यांकडे नेऊन बांधा असा सल्ला दिला. शिंदे यांच्या या वक्तव्याचा निषेधही प्रदेशाध्यक्षा सलगर यांनी व्यक्त करत 2019 च्या निवडणुकीत मंत्री शिंदे व जानकर यांना महाराष्ट्रातील जनता त्यांच्या घरच्या दावणीला नेहून नक्कीच बांधेल असा इशाराही प्रदेशाध्यक्षा सलगर यांनी दिला. 

राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारच्या फसव्या घोषणांना महाराष्ट्रातील जनता आता पुरती वैतागली आहे. 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजप सरकारला धडा शिकवतील. भाजपला सत्तेतून खाली खेचेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख