salgar and rahatkar | Sarkarnama

विजया रहाटकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा - सक्षना सलगर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : सत्ताधारी पक्षाचा एक जबाबदार आमदार जाहीरपणे मुली पळवून आणण्याची धमकी देतो आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यावर कारवाई करण्या ऐवजी गप्प बसतात. या घटनेवरून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सक्षम नाहीत हे सिध्द होते. तेव्हा विजया रहाटकर यांनी आपल्याला पदाचा राजीनामा देऊन एखाद्या सक्षम महिलेला तिथे काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षना सलगर यांनी केली. 

महिला, मुलींमध्ये जनजागृती करून त्यांना सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा व युवा संवाद साधण्यासाठी सलगर मराठवाडा दौऱ्यावर आहेत. औरंगाबादपासून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. राम कदम यांनी मुलींच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

सक्षणा सलगर म्हणाल्या, राज्यात महिला आयोग अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्‍न या निमित्ताने पडतो आहे. महिला, मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी या आयोगाने निपक्षपणे काम करणे अपेक्षित आहे. पण आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर त्यात अपयशी ठरल्या आहेत. सत्ताधारी पक्षाचा आमदार राम कदम दहीहंडी कार्यक्रमात जाहीरपणे मुली पळवून आणण्याची भाषा करतो आणि सरकार त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते. महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यावर तोंड उघडायला तयार नाहीत. त्यांनी स्वतःहून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राम कदम यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी होती. त्या देखील एक महिला आहेत. परंतु त्यांनी कुठलीच ठोस भूमिका घेतली नाही, किंवा या प्रकारावर आपले मत व्यक्त केलेले नाही. 

राम कदम याने मुली पळवून नेण्याचे केलेले विधान म्हणजे राज्यातील समस्त मुलींचा विनयभंग केल्याचाच प्रकार आहे. त्यामुळे तात्काळ कारवाई करून राम कदम यांना निलंबित केले पाहिजे. गेल्या चार वर्षात महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून महिलांना न्याय मिळवून देण्यात विजया रहाटकर यांना यश आलेले नाही. राम कदम प्रकरणात पुन्हा तेच दिसून आले आहे. त्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा देऊन महिलांना न्याय मिळवून देऊ शकेल, बेताल वक्तव्य करून महिलांचा अवमान करणाऱ्यांना लगाम घालेल अशा सक्षम महिलेकडे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद सोपवावे अशी मागणी मी राष्टवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने करते आहे असेही त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख