salgar and pankaja munde | Sarkarnama

पंकजाताई राम कदम तसा नाही तर कसा ? हे महाराष्ट्राला सांगा - सक्षणा सलगर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : "पंकजा ताई तुम्ही म्हणालात राम कदम तसा नाही, मग तो कसा आहे हे एकदा महाराष्ट्राला सांगा, असे आव्हान देतांनाच "तुमची बेटी बचाव मोहिम आहे की बेटी भगाव याचे उत्तर द्या' अशा शब्दांत राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या सलगर यांनी राम कदम यांनी मुलींच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सरकारवर सडकून टिका केली. अनेक महाविद्यालयात गेल्यावर युवक-युवतींकडून राम कदम यांच्या विधानावरून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. मुलीमंध्ये भीतीचे वातावरण देखील आहे.

औरंगाबाद : "पंकजा ताई तुम्ही म्हणालात राम कदम तसा नाही, मग तो कसा आहे हे एकदा महाराष्ट्राला सांगा, असे आव्हान देतांनाच "तुमची बेटी बचाव मोहिम आहे की बेटी भगाव याचे उत्तर द्या' अशा शब्दांत राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या सलगर यांनी राम कदम यांनी मुलींच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सरकारवर सडकून टिका केली. अनेक महाविद्यालयात गेल्यावर युवक-युवतींकडून राम कदम यांच्या विधानावरून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. मुलीमंध्ये भीतीचे वातावरण देखील आहे. अशावेळी राम कदम यांच्यावर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न सरकारमधील मंत्री करत असल्याचा आरोप सक्षणा सलगर यांनी केला. 

पंकजा मुंडे यांनी राम कदम तसा नाही असे विधान केल्याचा दावा करतांनाच मग राम कदम कसा आहे हे महाराष्ट्राला सांगा असे आव्हान त्यांनी दिले. पंकजा ताई तुम्ही महिला आहात, महिला व बालकल्याण खाते सांभाळता. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या म्हणून तुम्ही मोठ्या आहात, मी तुमच्या एवढी मोठी नाही. पण मग तुम्ही राबवत असलेली बेटी बचाव मोहीम आहे की बेटी भगाव असा प्रश्‍न जेव्हा तुम्ही राम कदम यांची बाजू घेता तेव्हा पडतो. मग तुम्ही महिलांच्या मंत्री आहात की राम कदम यांच्या असा खोचक सवाल देखील सक्षणा सलगर यांनी केला. 

मुंबईतून पळून नेलेल्या मुलींमागे राम कदम का? 
मुबईंतून हजारो मुली पळवून किंवा त्यांचे अपहरण झाल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. राम कदम यांच्या सारख्या दुशासनाने जाहीरपणे मुली पळवून नेण्याची धमकी दिल्यामुळे मग मुबंईतील या घटनांमागे देखील राम कदम यांचा हात आहे का अशी शंका येते? राज्यात गृहखाते अस्तित्वात आहे की नाही हेच समजत नाही. चार वर्षात हे खाते ज्यांच्याकडे आहे ते हे खाते सक्षमपणे सांभाळू शकलेले नाहीत हे सिध्द झाले आहे. त्यामुळे किमान आता तरी राम कदम यांना निलंबित करून गृहखात्याने आपले अस्तित्व दाखवावे अशी टीका सलगर यांनी केली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख