sakate and sanatan | Sarkarnama

सनातनसह शिवप्रतिष्ठानवरच्या बंदीसाठी 3 सप्टेंबरपासून आंदोलन : प्रा. मच्छिंद्र सकटे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

कऱ्हाड : सनातन व शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान या संस्था आगामी निवडणुकीत दंगली घडविण्याचे कटकारस्थान करत आहेत. ते सगळे थांबविण्यासाठी दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी दलित महासंघातर्फे तीन सप्टेंबरपासून राज्यभर आंदोलन करणार आहे,'' अशी माहिती दलित महासंघाचे संस्थापक प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कऱ्हाड : सनातन व शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान या संस्था आगामी निवडणुकीत दंगली घडविण्याचे कटकारस्थान करत आहेत. ते सगळे थांबविण्यासाठी दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी दलित महासंघातर्फे तीन सप्टेंबरपासून राज्यभर आंदोलन करणार आहे,'' अशी माहिती दलित महासंघाचे संस्थापक प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

प्रा. सकटे म्हणाले, ""देशात अराजकतेची स्थिती आहे. जातीयवादी शक्तींचा मोठा प्रभाव वाढतो आहे. नालासोपारा येथे वैभव राऊत नावाचा व्यक्ती 20 बॉंबसह सापडला, ही काही भूषणावह बाब नाही. राऊतनंतर यादी मोठी वाढत गेली. त्यात साताऱ्याचाही तरुण सापडला. जे कोणी तरुण सापडले ते सारे जण हिंदुत्वावादी संघटनांसाठी काम करत असल्याचे दिसून येते. त्यात सनातन संस्था व शिवप्रतिष्ठानशी संबंधित त्यांचे कार्य होते. या दोन्ही संस्था देशाच्या लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी आलीच पाहिजे. अशा संस्था देशाच्या लोकशाहीस धोकादायक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी . यासाठी जनजागृती करण्यासह लोकशाही मार्गाने थेट आंदोलन करण्याचा निर्णय दलित महासंघाने घेतला आहे. तीन सप्टेंबरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण राज्यभर होईल.'' 

प्रा. सकटे म्हणाले, ""शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे मनोहर भिडे यांच्यासह मिलिंद एकबोटे, सनातनचे जयंत आठवले यांची चौकशी झाली पाहिजे. नालासोपारा प्रकरणाताही त्यांची चौकशी झाली पाहिजे. बहुजनांच्या विकासाचे विचार मांडणाऱ्या लोकहितवादी विचारांच्या सुधारकांना बहुजन तरुणांकडून संपवले जात आहे. अशा मनुवादी विचाराचे राज्य आणण्याच्या ब्राह्मण्यवादी शक्तींविरोधात दलित महासंघ आक्रमक होणार आहे. त्यासाठी पुढच्या काळात संविधान हाच अभिमान अशी रॅलीही काढण्याचे नियोजन आहे. काही ठिकाणी चर्चासत्रे घेण्यात येणार आहेत.'' 

जयंत आठवलेंची चौकशी व्हावी... 
डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रा.गोविंद पानसरे, कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमागे सनातनचा नक्कीच संबंध आहे. त्या प्रकरणात जयंत आठवले यांची चौकशी होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख