आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी सकल मराठा समाजाचा भाजपला अल्टिमेटम

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी सकल मराठा समाजाचा भाजपला अल्टिमेटम

पंढरपूर :  मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान मराठा कार्यकर्त्यांवर दाखल केलेले  गुन्हे मागे घ्यावेत; अन्यथा लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात मतदान करु असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय रामभाऊ गायकवाड यांनी आज दिला. 

मराठा समाजाच्या प्रलंबीत मागण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. बैठकीनंतर मराठा समाजाच्या समन्वयकांनी सरकार विरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्य शासनाने दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, आंदोलना दरम्यान हुतात्मा  झालेल्या 42 तरुणांच्या कुटुंबांना 10 लाखाची मदत देऊन वारसांना शासकीय नोकरी द्यावी. अन्यथा लोकसभा निवडणुकीत मराठा समाज भाजपच्या कमळ चिन्हावरती बहिष्कार घालून विरोधी मतदान करेल. जर मागण्या पूर्ण केल्या तर मराठा समाज भाजपच्या पाठिशी राहील, असेही यावेळी गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com