Sairat Team Enters MNS | Sarkarnama

आर्ची - परशामुळे मनसेचे इंजिन धावणार सैराट

ज्ञानेश सावंत 
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

सैराटमधील अभिनयाने आर्ची आणि परशा सगळ्यांच्या पसंतीला उतरले. तेव्हाच ते घराघरांत पोचले. या चित्रपटानंतर दोघांबाबत राज्यभर उत्सुकता निर्माण झाली. ते वेगवेगळ्या कार्यक्रमांचे 'सेलिब्रिटी' ठरले. त्यात त्यांचा भावही तितकाच वाढला. गेल्या तीन-साडेतीन वर्षांत आर्ची आणि परशाची जादूही काही कमी झालेली नाही.

पुणे : महाराष्टातील तरुणाईच्या मनावर राज्य गाजविलेले सैराट चित्रपटातील अार्ची अर्थात, रिंकू राजगुरू आणि परशा म्हणजे आकाश ठोसर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला आहे. आर्ची, परशासह सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीही मनसे प्रवेश केला. या तिघांनी मनसेच्या चित्रपट सेनेचा अर्ज भरला असून, सैराट टीमच्या प्रवेशामुळे मनसेची आपलं इंजिन सैराट धावण्याची आशा जागी झाली असावी, हे मात्र नक्की. 

सैराटमधील अभिनयाने आर्ची आणि परशा सगळ्यांच्या पसंतीला उतरले. तेव्हाच ते घराघरांत पोचले. या चित्रपटानंतर दोघांबाबत राज्यभर उत्सुकता निर्माण झाली. ते वेगवेगळ्या कार्यक्रमांचे 'सेलिब्रिटी' ठरले. त्यात त्यांचा भावही तितकाच वाढला. गेल्या तीन-साडेतीन वर्षांत आर्ची आणि परशाची जादूही काही कमी झालेली नाही. उत्सवात विशेषत: दहिहंडीपासून गणेशोत्सवात तर आर्ची आणि प्ररशाला जोरात मागणी असते. आपली लोकप्रियता टिकून असल्याने आर्ची आणि परशाने आता थेट राजकारणात शिरकाव करण्याच्या दृष्टीने पहिलेवहिले पाऊल टाकले आहे. 

मनसेच्या चित्रपट सेनेचे प्राथमिक सदस्यत्व त्यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे हे दोघेही आता राजकारणात येण्याची शक्‍यता आहे. तेव्हाच, आर्च्ची आणि परशाच्या लोकप्रियतेचा फायदा होण्याची आशा आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांच्या उपस्थितीत आर्ची आणि परशाने अर्ज भरला. 

राज्याच्या राजकारणात अडगळीत सापडलेल्या मनसेच्या इंजिनाला आर्ची आणि परशा नेमका किती वेग देतील, हा उत्सुकतेचा विषय आहे. मात्र, काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकांमध्ये आर्ची आणि परशाला मात्र, मनसे महत्त्व येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ''रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे पक्षाचे सदस्य झाले आहेत. मात्र, त्यांचा पक्षाला किती फायदा होईल, याचा विचार करणे चुकीचे आहे,'' अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते बाळा नांदगगावकर यांनी 'सरकारनामा' शी बोलताना दिली. 

संबंधित लेख